लग्नानंतर विकी व कतरिना होणार ‘विरूष्का’चे शेजारी, नव्या घरात सुरू होणार राजा राणीचा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:00 PM2021-12-07T15:00:07+5:302021-12-07T15:05:46+5:30

Katrina Kaif and Vicky Kaushal wedding : लग्नानंतरचा हनीमूनचा प्लान विकी व कतरिनाने म्हणे रद्द केलाय. कारण काय तर दोघंही आपआपल्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड बिझी आहेत. पण हो, लग्नानंतर हे नवजोडपं नव्या घरात शिफ्ट होणार आहे.

Katrina Kaifa and Vicky Kaushal wedding katrina kaif vicky kaushal to become anushka sharma and virat kohli neighbours | लग्नानंतर विकी व कतरिना होणार ‘विरूष्का’चे शेजारी, नव्या घरात सुरू होणार राजा राणीचा संसार

लग्नानंतर विकी व कतरिना होणार ‘विरूष्का’चे शेजारी, नव्या घरात सुरू होणार राजा राणीचा संसार

googlenewsNext

Katrina Kaif  and Vicky Kaushal wedding : कतरिना कैफ (Katrina Kaif  )आणि विकी कौशल (Vicky Kaushal) लग्न करणार, लग्न करणार अशी चर्चा सुरु असतानाच आता हे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपलंय. येत्या 9 डिसेंबरला विकी व कॅट लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानातील  सवाई माधोपूरमध्ये विकी व कतरिनाचा शाही विवाहसोहळा होणार आहे. वर-वधू कधीच लग्नस्थळी दाखल झाले आहेत आणि पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली आहे. लग्नानंतरचा हनीमूनचा प्लान म्हणे विकी व कतरिनाने रद्द केला आहे. कारण काय तर दोघंही आपआपल्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड बिझी आहेत. पण हो, लग्नानंतर हे नवजोडपं नव्या घरात शिफ्ट होणार आहे.

विकी व कतरिनाने जुहू परिसरात एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये एक अलिशान घर भाड्यानं घेतल्याचं कळतंय. या नव्या घरात विकी व कतरिनाचा नवा संसार सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, इथे एक सेलिब्रिटी जोडपं त्यांचं शेजारी होणार आहे. होय,लग्नानंतर   लग्नानंतर कतरिना आणि विकी विराट कोहली व अनुष्का शर्माचे शेजारी होणार आहेत. विकी व कतरिनाने नवा फ्लॅट 60 महिन्यांसाठी भाड्यानं घेतला आहे. याच बिल्डिंगमध्ये अनुष्का व विराटचेही दोन फ्लोर आहेत. विकी व कॅटने नव्या फ्लॅटसाठी सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून 1.75 कोटींची रक्कम आणि 36 महिन्यांचं भाडं दिल्याचं कळतं. या घराचं भाडं 8 लाख रूपये महिना आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील विधींना आजपासून सुरुवात होत आहे. आज रात्री संगीत सेरेमनी, उद्या हळद आणि परवा लग्न, असा सगळा प्लान आहे. चाहते लग्नाचे फोटो पाहायला उत्सुक आहेत. पण कतरिना व विकीने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त केलाये. काल रात्री विकी व कॅट दोघेही पोलिसांच्या कडक बंदोबस्तात लग्नस्थळी पोहोचलेत. त्याठिकाणी त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं.

Web Title: Katrina Kaifa and Vicky Kaushal wedding katrina kaif vicky kaushal to become anushka sharma and virat kohli neighbours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.