Katrina Kaif will be seen with a southern superstar on a silver screen | कतरिना कैफ ह्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर
कतरिना कैफ ह्या दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत झळकणार रुपेरी पडद्यावर

ठळक मुद्देकतरिना कैफ करणार साऊथच्या चित्रपटात कामकतरिना कैफ करणार महेश बाबूसोबत काम


बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणजेच अभिनेत्री कतरिना कैफने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. फक्त अभिनय कौशल्यानेच नाही तर तिने आपल्या नृत्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. आता म्हणे ती दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. इतकेच नाही तर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचेही बोलले जात आहे.

कतरिना सध्या सलमानच्या बहुचर्चित 'भारत' चित्रपटामध्ये व्यग्र असून या चित्रपटानंतर ती चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. 


सध्या या चित्रपटाविषयी केवळ चर्चा सुरु असून अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झालेले नाही. मात्र या चित्रपटामध्ये कतरिना आणि महेश बाबू हे प्रमुख भूमिकेत असावे अशी चित्रपट दिग्दर्शकांची इच्छा असून त्यांनी याप्रकरणी दोन्ही कलाकारांकडे विचारणादेखील केली आहे. विशेष म्हणजे महेश बाबूने या चित्रपटासाठी होकार कळविला असून कतरिनाने मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जर कतरिनाने हा चित्रपट साईन केला तर १० वर्षांमध्ये तिचा हा तिसरा तेलुगू चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी कतरिनाने व्यंकटेश दुग्गुबती यांच्या 'मल्लिकाश्वरी' आणि नंदमूरी बालकृष्ण यांच्या 'अलारी पिडुगु' या चित्रपटामध्ये काम केले आहे. मात्र रुपेरी पडद्यावर कतरिना व महेश बाबू यांना एकत्र काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: Katrina Kaif will be seen with a southern superstar on a silver screen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.