ठळक मुद्देकतरिना कैफला इन्स्टाग्रामवर आणणारी व्यक्ती दुसरी कोणी नाही तर रणबीर असल्याचे कतरिनाने अरबाजला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. ती म्हणाली, मला इन्स्टाग्राम कसे वापरायचे हे रणबीरने शिकवले.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर अनेक वर्षं नात्यात होते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कतरिनाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिने काही फ्लॉप चित्रपट दिले. बॉलिवूडमध्ये आता तिचे काही खरे नाही असे सगळ्यांना वाटत असतानाच सलमान खानच्या मैंने प्यार क्यों किया या चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. याच दरम्यान सलमान आणि तिच्या अफेअरच्या मीडियात चर्चा रंगत होत्या. त्यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येत होते. सलमान आणि कतरिना लग्न करणार असे सगळ्यांना वाटत असतानाच त्यांचे ब्रेकअप झाले.

कतरिना आणि सलमानच्या नात्यात दुरावा आल्यानंतर काहीच दिवसांत रणबीर कपूरच्या आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आला. ते दोघे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे देखील म्हटले जात होते. पण सहा वर्षांच्या नात्यानंतर त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. कतरिना नुकतीच अरबाज खानच्या चॅट शो मध्ये उपस्थित होती. या चॅट शो मध्ये तिने तिच्या खाजगी आयुष्याविषयी भरभरून गप्पा मारल्या. एवढेच नव्हे तर ती रणबीर कपूरकडून एक गोष्ट शिकली असल्याचे तिने या कार्यक्रमात कबूल केले. 

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर त्यांचे फॅन्स मोठ्या प्रमाणात फॉलो करत असून ते आपल्या फॅन्ससाठी फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. पण या सगळ्या सेलिब्रेटींमध्ये कतरिना कैफची इन्स्टाग्रामवर एंट्री खूपच उशिरा झाली. तिला इन्स्टाग्रामवर आणणारी व्यक्ती दुसरी कोणी नाही तर रणबीर असल्याचे कतरिनाने अरबाजला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. ती म्हणाली, मला इन्स्टाग्राम कसे वापरायचे हे रणबीरने शिकवले. त्याच्यामुळे मी इन्स्टाग्रामवर माझे अकाऊंट सुरू केले. 

कतरिनाचे आता इन्स्टाग्रामवर अनेक फॉलोव्हर्स आहेत. सोशल मीडियाविषयी अरबाजने कतरिनाला आणखी एक प्रश्न या कार्यक्रमात विचारला होता. तुझे सोशल मीडियावर फेक अकाऊंट आहे का असे कतरिनाला विचारले असता तिने सांगितले, माझे फेक अकाऊंट नाहीये. पण रणबीरचे फेक अकाऊंट असल्याचे मला माहीत आहे. 


Web Title: Katrina Kaif: Ranbir Kapoor taught me how Instagram works
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.