मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:43 PM2020-01-05T13:43:05+5:302020-01-05T13:43:43+5:30

कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट डेनियल सी बाऊरचे गोव्यात थाटामाटात लग्न झाले. कतरीना या लग्नात सहभागी झाली.

katrina kaif graces her make up artist gay wedding in goa | मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स

मेकअप आर्टिस्टच्या ‘गे वेडिंग’मध्ये पोहोचली कतरीना कैफ, केला धम्माल डान्स

googlenewsNext
ठळक मुद्देकतरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘सूर्यवंशी’ या सिनेमात दिसणार आहे.

बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यात त्यांचा क्रू, स्पॉट बॉय, मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर, स्टाइलिस्ट यांचे खास स्थान असते. दीर्घकाळ एकमेकांसोबत काम केल्यामुळे स्टार्स व यांच्यात खास बॉन्ड तयार होतो. त्यामुळे स्टार्स आपल्या स्टाफच्या आनंदात वा दु:खात स्टार्स सहभागी होताना दिसतात. आता कतरीना कैफचेच बघा ना. कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट डेनियल सी बाऊरचे गोव्यात थाटामाटात लग्न झाले. कतरीना या लग्नात सहभागी झाली.

होय, कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट डेनियल सी बाऊरने नुकतेच त्याचा गे पार्टनर टाइरोन ब्रगनजासोबत गोव्यात लग्न केले. हिंदू पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. मेहंदी, हळद, सप्तपदी अशा सगळ्या विधींसह पार पडलेल्या या लग्नातील कतरीनाची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

या गे वेडिंगचे फोटो कतरीनाने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केलेत. या लग्नात कतरीना धम्माल मज्जा करताना दिसली. पेस्टल ब्ल्यू कलरच्या लंहग्यामध्ये तिने धम्माल डान्सही केला. या डान्सचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

डेनिअल व टाइरोन यांनी 2019 मध्ये जर्मनीमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. नुकतेच गोव्यात त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न केले. लग्नापूर्वी दोन वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. 


कतरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘सूर्यवंशी’ या सिनेमात दिसणार आहे. यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताा दिसेल. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 27 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात अजय देवगण व रणवीर सिंगही कॅमिओ रोलमध्ये दिसतील. ‘सूर्यवंशी’ या सिनेमाआधी कतरीना ‘भारत’मध्ये सलमान खानसोबत झळकली होती.

Web Title: katrina kaif graces her make up artist gay wedding in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.