कठोर सुरक्षा व्यवस्था असतानाही विकी-कतरिनाच्या वेडिंग वेन्यूचा पहिला व्हिडीओ आला समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 01:09 PM2021-12-07T13:09:52+5:302021-12-07T18:54:51+5:30

विकी आणि कतरिना सोमवारी संध्याकाळी कुटुंबियांसह राजस्थानला पोहोचले आहेत.

Katrina kaif and vicky kaushal wedding venue inside video gets viral | कठोर सुरक्षा व्यवस्था असतानाही विकी-कतरिनाच्या वेडिंग वेन्यूचा पहिला व्हिडीओ आला समोर

कठोर सुरक्षा व्यवस्था असतानाही विकी-कतरिनाच्या वेडिंग वेन्यूचा पहिला व्हिडीओ आला समोर

googlenewsNext

विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) च्या लग्नाबाबत चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित कितीतरी अपडेट्स सतत समोर येत आहेत. विकी आणि कतरिना सोमवारी संध्याकाळी कुटुंबियांसह राजस्थानला पोहोचले. दरम्यान, वेडिंग वेन्यूचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहुण्यांचे भव्य स्वागत होताना दिसते आहे.हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप खुश झाले आहेत. लग्नाबद्दलची अधिकाधिक अपटेड्स जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतायेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. 

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.. या व्हिडिओमध्ये राजेशाही किल्ला दिसत आहे, जिथे पाहुण्यांचे स्वागत अतिशय भव्य पद्धतीने केले जातंय. किल्ल्याच्या भिंतींवर फटाक्यांची जोरदार रोषणाई केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. तर काही लोक जोधा अकबरचे ख्वाजा मेरे ख्वाजा हे गाणे गाताना दिसतायेत.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूप एक्साटेड झालेत आणि या बिग फॅट ग्रँड वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर आहेत.काही चाहत्यांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की या कार्यक्रमात मोबाइलवर बंदी असताना, व्हिडिओ कसा लीक झाला.

मीडिया रिपोर्टनुसार आज विकी कौशल  आणि कतरिना कैफच्या प्री-वेडिंग (Vicky Kaushal And Katrina Kaif Pre-Wedding Ceremony) सेरेमनीला सुरुवात झाली आहे. रिपोर्ट्समध्ये,आधी विकी आणि कतरिना हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करतील.आज कतरिनाच्या हातावर मेहंदी लागणार आहे.  ​कतरिना कैफ जेव्हा तिच्या घरातून राजस्थानला निघाली तेव्हा बाला पिवळ्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत होती. मात्र, विमानतळावरही विकी आणि कतरिना वेगळी एन्ट्री करताना दिसले.
 

Web Title: Katrina kaif and vicky kaushal wedding venue inside video gets viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.