मिथुन चक्रवर्ती अचानक पडले आजारी, थांबवावं लागलं 'द कश्मीर फाइल्स'चं शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:38 PM2020-12-21T12:38:20+5:302020-12-21T12:40:37+5:30

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, 'आम्ही लोक एक मोठ्या अॅक्शन सीनचं शूटींग करत होतो. सगळं काही ठिक सुरू  होतं.

The Kashmir Files shoot suspended due to Mithun Chakraborty bad health condition | मिथुन चक्रवर्ती अचानक पडले आजारी, थांबवावं लागलं 'द कश्मीर फाइल्स'चं शूटींग

मिथुन चक्रवर्ती अचानक पडले आजारी, थांबवावं लागलं 'द कश्मीर फाइल्स'चं शूटींग

googlenewsNext

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द कश्मीर फाइल्स' नावाचा एक सिनेमा करत आहे. यात अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं शूटींग सुरू झालं आहे. पण मिथुन चकवर्ती अचानक आजारी पडल्याने एक दिवसासाठी सिनेमाचं शूटींग बंद करावं लागलं. असे सांगितले जात आहे की, मिथुन यांना फूड पॉयजनिं झालं आहे. सध्या सिनेमाचं शूटींग मसूरीमध्ये सुरू आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने सांगितले की, 'आम्ही लोक एक मोठ्या अॅक्शन सीनचं शूटींग करत होतो. सगळं काही ठिक सुरू  होतं. पण पोटात संक्रमण झाल्यामुळे मिथुन आजारी पडले होते.  कोणताही सामान्य माणूस अशा कंडीशनमध्ये उभा राहू शकत नाही. पण अशा स्थितीतही ते बाहेर आले आणि त्यांनी त्यांचा पूर्ण सीन शूट केला. कदाचित यामुळे मिथुन सुपरस्टार आहेत'.

विवेक पुढे म्हणाला की, 'मिथुन यांनी मला सांगितलं की ते आजारी नाहीत. ते सतत मला शूटींगबाबत विचारत राहत होते. मला धक्का बसला कारण इतक्या जिद्दीने नव्या जनरेशनची लोकं पण काम करत नाहीत. मिथुन दा या वयातही आपल्या कामावर फार लक्ष देतात. ते फार मेहनती आणि प्रोफेशनल आहेत.

विवेक अग्निहोत्री म्हणाला की, त्यांचा आगामी सिनेमा 'द कश्मीर फाइल्स'मध्ये तो कश्मीरमधील हिंदुंची स्थिती याबाबत दाखवणार आहे. याआधी विवेक अग्निहोत्रीचा 'द ताशकंत फाइल्स' सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नव्हता. आता द कश्मीर फाइल्स हा सिनेमा २०२१ मध्ये रिलीज होणार आहे.
 

Web Title: The Kashmir Files shoot suspended due to Mithun Chakraborty bad health condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.