Kartik Aryan wants to take Princess Sara Ali Khan to date, but the condition that Saif has kept | कार्तिक आर्यनला प्रिन्सेस सारा अली खानला घेऊन जायचंय डेटवर, पण सैफने ठेवलीय ही अट
कार्तिक आर्यनला प्रिन्सेस सारा अली खानला घेऊन जायचंय डेटवर, पण सैफने ठेवलीय ही अट

सारा अली खानलाकार्तिक आर्यन खूप आवडत असल्याचे तिने बऱ्याचदा सांगितले आहे आणि तिला त्याच्यासोबत डेटवर जायचे आहे. मात्र कार्तिक एका कारणामुळे तिला डेटवर घेऊन जाऊ शकत नाही.

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेहमीच चर्चेत असतात. साराने बऱ्याचदा सांगितले आहे की कार्तिक आर्यन तिचे क्रश आहे. याबाबत कार्तिकला विचारले असता तो लाजतो किंवा उडवाउडवीची उत्तरे देतो.
आता कॉफी विथ करण शोच्या आगामी भागात करण जोहरने याबाबत कार्तिकला विचारले. साराने खुलेआम सांगितले आहे की तिला कार्तिक आर्यनसोबत डेटवर जायचे आहे. तर कार्तिकने देखील डेटवर जायला तयार असल्याचे सांगितले होते. तर नुकतेच कार्तिकने करणच्या जुन्या शोचा संदर्भ देत सारा सोबत डेटवर जाण्याबाबत खुलासा केला.

त्या भागात सैफ अली खानने सांगितले होते की, जर पैसे आहेत तर साराला घेऊन जा. त्यावर कार्तिकने खुलासा केला की, मी तेच करत आहे. मी जास्तीत जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करत आहे. सैफ सरांनी सांगितले होते की जर तुझ्याजवळ पैसे आहेत तर साराला घेऊन जा. सारा प्रिन्सेस असून तिला डेटवर घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे बॅंक बॅलन्स असणे गरजेचे आहे.

Web Title: Kartik Aryan wants to take Princess Sara Ali Khan to date, but the condition that Saif has kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.