ठळक मुद्देअभिनेता कार्तिक आर्यन याचा सिनेमा ‘पति पत्नी और वो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दीपिका पादुकोणने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत, कार्तिक आर्यनला ‘धीमे धीमे’ या गाण्याच्या डान्स स्टेप्स शिकवण्याची विनंती केली होती. कार्तिक काय तू मला धीमे धीमे स्टेप्स शिकवणार? मला सुद्धा धीमे धीमे चॅलेंजमध्ये भाग घ्यायचाय, असे दीपिकाने लिहिले होते. यावर नक्कीच, तू लगेच शिकशील, फक्त केव्हा ते कळव, असे उत्तर कार्तिकने दिले होते.  कार्तिकने दीपिकाची विनंती मान्य केल्यानंतर दीपिकाला तो डान्स स्टेप कधी शिकवणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर आज ही प्रतिक्षा संपली.


दीपिकाच्या विनंतीस मान देत कार्तिकने अखेर तिला या गाण्याच्या स्टेप्स शिकवल्याच. ते सुद्धा चक्क विमानतळावर.  पण यावेळी असे काय झाले की कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले.
रविवारी कार्तिक आणि दीपिका मुंबई एअरपोर्टवर  स्पॉट झाले. यावेळी त्या दोघांनी खूप गप्पा मारल्या. यावेळी दीपिका पुन्हा एकदा कार्तिकला डान्स स्टेप शिकवण्यासाठी विनंती करताना दिसली आणि कार्तिकनेही दीपिकाला डान्स स्टेप शिकवल्या.


कार्तिकने यावेळी ब्लूटूथ स्पीकर मागवला आणि त्यावर धीमे-धीमे गाणे सुरू करत दीपिकाला डान्स स्टेप शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला दीपिकाला या स्टेप समजत नव्हत्या. मग कार्तिकने तिचे पाय पकडून तिला स्टेप शिकवल्या.


यानंतर काही क्षणातच दीपिका कार्तिकसोबत धीमे-धीमे गाण्यावर थिरकली. तिने काहीच मिनिटात अगदी परफेक्ट डान्स स्टेप शिकल्या.
अभिनेता कार्तिक आर्यन याचा सिनेमा ‘पति पत्नी और वो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पार्टी साँग ‘धीमे धीमे’ रिलीज झाले. मागच्या काही दिवसांपासून हे गाणे सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. 

Web Title: kartik aaryan teach deepika padukone dance dheeme dheeme viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.