ठळक मुद्देलवकरच आता कार्तिक आणि सारा ‘लव आज कल 2’ या चित्रपटात झळकणार आहेत.

अखेर सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान हिच्या प्रेमाचा खुलासा झालाच. होय, अभिनेता कार्तिक आर्यनच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला’ होता. कारण कार्तिक व सारा दोघांनीही या रिलेशनशिपचा खुलासा केला नव्हता. पण कालचा दिवस खास होता. काल साराचा वाढदिवस होता. प्रेमाची कबुली द्यायला यापेक्षा चांगला दिवस कुठला असणारा. सारा व कार्तिकने नेमका हाच दिवस निवडला आणि आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.
यापूर्वी सारा व कार्तिक अनेकदा एकत्र दिसले. पण दोघांनीही आपले रिलेशनशिप लपवण्याचा नको इतका खटाटोप केला. कार्तिक तर कायम तोंड लपवून सारासोबत फिरताना दिसला. पण आता कार्तिक पहिल्यांदा ‘खुल्लम खुल्ला’ समोर आला. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटने साराच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.

सारा व कार्तिक दोघांनीही थायलंडमध्ये हे सेलिब्रेशन केले. ‘ राजकुमारीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि ईद मुबारक (पण यावेळी कोणत्याही मास्कशिवाय)’, असे हा फोटो शेअर करताना कार्तिकने लिहिले. एकंदर काय तर अनेकदा तोंड लपवून साराशी भेटणा-या कार्तिकने पहिल्यांदा  मोकळेपणाने त्याचे प्रेम व्यक्त केले आहे.


 ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली. त्यानंतर लोकमत स्टाईल अवार्ड सोहळ्यात रणवीर सिंगने सारा व कार्तिकची भेट घालून दिली होती.

  कार्तिक आणि सारा लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार आहेत. ‘लव आज कल 2’मध्ये या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.


Web Title: Kartik Aaryan makes it official with Sara Ali Khan in his birthday post for the actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.