ठळक मुद्देकार्तिक ज्या घरात 12 लोकांसोबत भाड्यावर राहात होता, त्याने तेच घर विकत घेतले आहे. हे घर मुंबईतील वर्सोवा या भागात असून या घराची किंमत सुमारे 1.60 कोटी असल्याचे समजंतंय. 

सोनू की टीटू की स्वीटी आणि लुका छुपी चित्रपटानंतर कार्तिक आर्यननं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. आता त्याच्याकडे चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स आहेत. कार्तिकने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख स्वतःच्या हिमतीवर बनवली आहे. त्याचा इंडस्ट्रीत कुणीही गॉडफादर नाही. त्यामुळे त्याला सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावा लागला होता. पण गेल्या काही काळात त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. 

कार्तिकला त्याच्या पहिल्याच ऑडिशनमध्ये नकार पचवायला लागला होता. पण तरीही त्याने आपल्या जिद्दीवर बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. प्यार का पंचनामा हा त्याचा बॉलिवूडमधील पहिलाच चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. कार्तिक त्याच्या स्ट्रगलिंग दिवसांच्या काळात तब्बल 12 स्ट्रगर्लसोबत मुंबईतील एकाच फ्लॅटमध्ये राहात होता. तो फ्लॉट टू बीएचकेचा असून कार्तिकसाठी हे घर खूपच खास आहे. कारण त्याचे मुंबईतील हक्काचे ते पहिले घर होते. पण आता कार्तिक ज्या घरात 12 लोकांसोबत भाड्यावर राहात होता, त्याने तेच घर विकत घेतले आहे. हे घर मुंबईतील वर्सोवा या भागात असून या घराची किंमत सुमारे 1.60 कोटी असल्याचे समजंतंय. 

सध्या कार्तिक त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. 'लव आज कल २' या चित्रपटाचे तो चित्रीकरण करत असून या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला सारा अली खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण शिमल्यात सुरू असताना हे लव्हबर्ड्स एकत्र वेळ घालवताना दिसले होते. तसेच मोकळ्या वेळात सारा आणि कार्तिक फिरायला देखील जाताना दिसले होते. दोघंही शिमल्याच्या निसर्गरम्य पर्वतरांगामध्ये आनंद लुटत असल्याचं दिसून आले होते. 

या चित्रपटाप्रमाणेच तो पती पत्नी और वो या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून या चित्रपटात अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर त्याच्या नायिका आहेत. त्याच्या या दोन्ही चित्रपटांची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.  
 


Web Title: Kartik Aaryan Buys Same Mumbai Flat He Once Lived In As A Paying Guest
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.