करणी सेना पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! ‘पद्मावत’नंतर ‘पृथ्वीराज’च्या सेटवर गोंधळ, दिग्दर्शकाला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:00 PM2020-03-17T12:00:50+5:302020-03-17T12:01:41+5:30

अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा आगामी सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे.

Karni Sena disrupts Akshay Kumar starrer Prithviraj shoot-ram | करणी सेना पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! ‘पद्मावत’नंतर ‘पृथ्वीराज’च्या सेटवर गोंधळ, दिग्दर्शकाला दिला इशारा

करणी सेना पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! ‘पद्मावत’नंतर ‘पृथ्वीराज’च्या सेटवर गोंधळ, दिग्दर्शकाला दिला इशारा

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलिवूड डेब्यू करतेय.

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ या सिनेमानंतर आता अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा आगामी सिनेमा करणी सेनेच्या निशाण्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी जयपूर येथे  ‘पृथ्वीराज’च्या शूटींगदरम्यान करणी सेनेने गोंधळ घातला. 
करणी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंग मकराना आपल्या संघटनेच्या काही सदस्यांसह शनिवारी जमवारामगड गावात  ‘पृथ्वीराज’च्या सेटवर धडकले. या सर्वांनी शूटींग थांबवण्याची मागणी लावून धाली. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी करणी सेनेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांसोबत कुठलीही छेडछाड करण्यात आलेली नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. मात्र याऊपही करणी सेनेचे समाधान झाले नाही. आम्हाला तसे लेखी द्या, अशी मागणी करणी सेनेने लावून धरली. सेटवर हा गोंधळ झाला तेव्हा अक्षय कुमार सेटवर हजर नव्हता.


यासंदर्भात महिपाल सिंग मकराना यांनी सांगितले की, ‘पृथ्वीराज’चे दिग्दर्शक चंद्रप्रकाश यांच्यासोबत आमची चर्चा झालीय. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांसोबतची कोणत्याही प्रकारची छेडछाड आम्ही सहन करणार नाही, हे आम्ही त्यांना बजावले आहे. चित्रपटात पृथ्वीराज प्रियकर म्हणून दाखवले जाणार नाहीत. चित्रपटात आक्षेपार्ह असे काहीही असणार नाही, असे आश्वासन दिग्दर्शकांनी आम्हाला दिले आहे. पण आम्हाला लेखी आश्वासन हवे आहे.’


सुमारे दोन वर्षांपूर्वी करणी सेनेने ‘पद्मावत’ या चित्रपटाला जोरदार विरोध केला होता. अगदी चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच करणी सेनेने जयपूरमधील सेट जाळला होता. चित्रपटात अलाउद्दीन खिलजी व राणी पद्मावतीचा रोमान्स दाखविल्याचा विरोध करत करणी सेनेने   चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. हा विरोध इतका प्रखर होता की, संजय लीला भन्साळींनाही सेटवर धक्काबुक्की करण्यात आली होती. ऐनवेळी चित्रपटाचे ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले होते. याऊपरही हा विरोध कमी झाला नव्हता. 

‘पृथ्वीराज’ हा सिनेमा  राजा पृथ्वीराज यांच्या जीवनावर आणि शौर्यावर हा चित्रपट आधारित असेल. या चित्रपटातून ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर बॉलिवूड डेब्यू करतेय.  राजा पृथ्वीराजाची प्रेयसी असणा-या देखण्या संयोगिताच्या भूमिकेत मानुषी झळकणार आहे.  

Web Title: Karni Sena disrupts Akshay Kumar starrer Prithviraj shoot-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.