करिश्मा कपूरच्या प्रेमकैदी चित्रपटातील नायक दिसतो आता असा, ओळखणे देखील झालंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 06:52 PM2021-06-24T18:52:58+5:302021-06-24T18:55:04+5:30

30 वर्षांपूर्वी आलेल्या 'प्रेम कैदी' करिश्मा कपूरच्या डेब्यू सिनेमाचा नायक हरीश कुमार होता.

Karisma Kapoor's first hero Harish Kumar look now | करिश्मा कपूरच्या प्रेमकैदी चित्रपटातील नायक दिसतो आता असा, ओळखणे देखील झालंय कठीण

करिश्मा कपूरच्या प्रेमकैदी चित्रपटातील नायक दिसतो आता असा, ओळखणे देखील झालंय कठीण

googlenewsNext
ठळक मुद्देहरीशने आपल्या करिअरमध्ये हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि इतर भाषांमधील सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या कलाकारांसह काम करत आपले अस्तित्व निर्माण केले होते.

30 वर्षांपूर्वी आलेल्या 'प्रेम कैदी' करिश्मा कपूरच्या डेब्यू सिनेमाचा नायक हरीश कुमार होता. सोशल मीडियावर हरीशचा फोटो व्हायरल होत असून त्यात त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे. हरीश सध्या लाइमलाइटपासून दूर असून त्याचे आयुष्य एन्जॉय करतोय. तो बराच काळापासून सिनेसृष्टीपासून दूरच आहे. 

हरीशने आपल्या करिअरमध्ये हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि इतर भाषांमधील सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या कलाकारांसह काम करत आपले अस्तित्व निर्माण केले होते. हरीशने 'आदमी', 'क्रांति क्षेत्र', 'द जेंटलमैन', 'फूलन देवी', 'रावण राज', 'जवाब', 'गद्दार', 'भीष्मा', 'आर्मी', 'फूल और आग', 'बुलंदी', 'इंतकाम' सिनेमात काम करत रसिकांची पसंती मिळवली होती.

गोविंदा, रेखा, श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती, पूजा भट्ट, अनिल कपूर यासारख्या लोकप्रिय कलाकारांसह झळकूनही त्याला फारसे यश मिळू शकले नाही. हरीश कुमार त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमामिळून 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. हरीश कुमारने नाना पाटेकर सोबत ‘तिरंगा’ सिनेमात भूमिका केली होती. याशिवाय त्याने गोविंदासह 'कुली नं 1' सारख्या सिनेमात काम केले आहे 'कुली नं 1' सिनेमात हरीशने गोविंदाच्या मित्राची भूमिका साकरली होती. 

९० च्या दशकात हरीश कुमारचे करियर सुरुळीत सुर असतानाच तो सिनेमांपासून दूर गेला. हरीश आपले वजन नियंत्रित करू शकला नाही. त्यामुळे त्याचा लूक पूर्णपणे बदलला होता. लठ्ठपणामुळे त्याला काम मिळणेही बंद झाले होते.  2001 मधील ‘इंतकाम’ या सिनेमानंतर तो लाइमलाइटपासून दूर गेला. २०१० मध्ये त्याने 'नॉटी एट ४०' या सिनेमाद्वारे पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

या सिनेमात गोविंदासुद्धा होता. २०१२ मध्ये तो ‘चार दिन की चांदनी’ सिनेमात झळकला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता. 1995 मध्ये हरीशने संगीता चुगशी लग्न केले. त्याला दोन मुलं असून तो आपल्या कुटूंबासह मुंबईत राहतो.

Web Title: Karisma Kapoor's first hero Harish Kumar look now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.