करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:42 PM2021-06-22T14:42:40+5:302021-06-22T14:43:06+5:30

करिश्मा कपूरने पहिल्या चित्रपटातील तिचा स्विमसूटमधील फोटो शेअर केला आहे.

Karisma Kapoor wore a swimsuit in the first movie, now shared photo | करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो

करिश्मा कपूरने पहिल्याच चित्रपटात स्विमसूट परिधान करून माजवली होती खळबळ, आता शेअर केला फोटो

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर एकेकाळी सुंदर, बिनधास्त आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणली जात होती. करिश्मा कपूर तिच्या फिटनेस आणि फिगरसाठीदेखील खूप चर्चेत राहत होती. करीना कपूरपेक्षा सहा वर्षे मोठी असणाऱ्या करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाची सुरूवात १९९१ साली २१ जून रोजी रिलीज झालेला चित्रपट प्रेम कैदीमधून केली होती. 


प्रेम कैदी चित्रपटात काम करताना करिश्मा कपूर १६-१७ वर्षांची होती. करिश्माने पहिल्या चित्रपटाला तीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटातील स्विम सूटमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत करिश्माने लिहिले की, मूड. प्रेम कैदीचे ३० वर्षे. १७ वर्षांच्या मुलीचा हा आत्मविश्वास. प्रत्येक दिवसासाठी आभारी.


संजय कपूरने करिश्माच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, मी तुझा पहिला हिरो बनू शकलो असतो. करिश्मा कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. त्यानंतर तिने बरेच चित्रपट साइन केले. सुरूवातीच्या काळात करिश्मा चित्रपटातील लूक आणि गेटअपमुळे चर्चेत येत होती. १९९६ साली रिलीज झालेला चित्रपट राजा हिंदुस्तानीमध्ये करिश्माचा मेकओव्हर खूप सुपरहिट ठरला.


प्रेम कैदी १९९० साली रिलीज झालेला तेलगू सिनेमा प्रेम कैदीचा रिमेक होता. ही म्युझिकल लव्हस्टोरी होती. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुरली मोहन यांनी केले होते.

चित्रपटाची निर्मिती डी रामा नायडूने केली होती. जे राणा दुग्गाबातीचे आजोबा होते. या चित्रपटात करिश्मा कपूरसोबत हरीश कुमार मुख्य भूमिकेत होता. 

Web Title: Karisma Kapoor wore a swimsuit in the first movie, now shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.