ठळक मुद्देअक्षयसोबतचे चित्रपट करिश्मा नाकारत असल्याचे फिल्ममेकर्सच्या देखील लक्षात आले होते आणि त्याचमुळे तिला अक्षयसोबतच्या चित्रपटांसाठी विचारणे बंद झाले होते.

करिश्मा कपूरचा आज म्हणजेच २५ जूनला वाढदिवस असून अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता यांची ती मोठी मुलगी आहे. करिश्माच्या घरातच फिल्मी वातावरण असल्याने ती खूपच कमी वयात या इंडस्ट्रीकडे वळली. तिने वयाच्या सतराव्या वर्षी प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. करिश्माने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. करिश्माने दिल तो पागल है, राजा हिंदुस्थानी, फिजा, झुबैदा, बिवी नं. १ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

करिश्माने गोविंदा, सलमान खान, अजय देवगण यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने अक्षय कुमारसोबत दीदार या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते. पण काही काळानंतर अक्षयसोबत काम करायला तिने नकार दिला असल्याचे वृत्त पिंकव्हिलाने दिले होते. त्यांच्या वृत्तानुसार, नव्वदीच्या दशकात अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप होत होते. अक्षय आणि करिश्माने सपूत, मैदान ए जंग, लहू के दो रंग अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण हे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले होते आणि त्याचमुळे अक्षयसोबत काम करायचे की नाही असा प्रश्न करिश्मा पुढे उभा राहिला होता. खरे तर अक्षय आणि करिश्मा खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. पण तरीही तिला तिच्या व्यवसायिक आयुष्याबाबत कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती आणि त्याचमुळे तिने अक्षय मुख्य भूमिकेत असलेले अनेक चित्रपट नाकारले होते. अक्षयच्या संघर्ष या चित्रपटात प्रीती झिंटा झळकली होती तसेच त्याच्या हेरा फेरी या चित्रपटात तब्बूने काम केले होते. हे दोन्ही चित्रपट करिश्माला ऑफर करण्यात आले होते. पण तिने या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. 

अक्षयसोबतचे चित्रपट करिश्मा नाकारत असल्याचे फिल्ममेकर्सच्या देखील लक्षात आले होते आणि त्याचमुळे तिला अक्षयसोबतच्या चित्रपटांसाठी विचारणे बंद झाले होते. पण अक्षय आणि करिश्माचा जानवर हा चित्रपट काही वर्षं रखडल्यामुळे तो १९९९ मध्ये प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आणि त्याच चित्रपटाने अक्षयच्या करियरला एक वेगळी दिशा दिली. जानवर हिट झाल्यानंतर करिश्माने एक रिश्ता या चित्रपटात त्याच्यासोबत काम केले. पण काही वर्षांनी करिश्मापेक्षा अक्षय मोठा स्टार बनला.


Web Title: Karisma Kapoor Birthday Special: Karisma Kapoor's Hot and Cold Relationship With Akshay Kumar!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.