ठळक मुद्देअंदाज अपना अपना या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन आपल्याला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांमध्ये अबोला होता.

करिश्मा कपूरचा आज म्हणजेच २५ जूनला वाढदिवस असून अभिनेता रणधीर कपूर आणि बबिता यांची ती मोठी मुलगी आहे. करिश्माच्या घरातच फिल्मी वातावरण असल्याने ती खूपच कमी वयात या इंडस्ट्रीकडे वळली. तिने वयाच्या सतराव्या वर्षी प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. करिश्माने नव्वदीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. करिश्माने दिल तो पागल है, राजा हिंदुस्थानी, फिजा, झुबैदा, बिवी नं. १ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

करिश्माच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. अभिनेता अभिषेक बच्चनसोबत तिचा साखरपुडा झाला होता. पण अचानक काही कारणांनी त्या दोघांचा साखरपुडा मोडला आणि काहीच वर्षांत करिश्माने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्या दोघांमध्ये सतत खटके उडू लागले आणि त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला.

अंदाज अपना अपना या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन आपल्याला एकत्र पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटात त्या दोघी बेस्ट फ्रेंड्स असल्याचे दाखवण्यात आले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या दोघांमध्ये अबोला होता. या दोघांमध्ये भांडणे होण्यासाठी एक अभिनेता कारणीभूत होता. हा अभिनेता दुसरे कोणीही नाही तर अजय देवगण होता.

अजय आणि रवीना यांचे अनेक वर्षं अफेअर होते. अजय आणि रवीनाने गैर, दिलवाले, एक ही रास्ता, जंग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात अनेक वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण अजयच्या आयुष्यात करिश्मा कपूर आल्यानंतर त्याने रवीनासोबत ब्रेकअप केले. अजयवर रवीना प्रचंड प्रेम करत होती. त्यामुळे अजय तिच्यापासून दूर गेलेला ती सहनच करू शकली नव्हती आणि तिने डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला असल्याचे नव्वदीच्या दशकात अनेक वर्तमानपत्रात आले होते. 

बॉलिवूड आजकल या युट्युब वाहिनीनुसार, काजोल आणि अजयने हलचल या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची मैत्री झाली. त्यावेळी काजोल कार्तिक मेहताला तर अजय करिश्माला डेट करत होता. काजोल आणि कार्तिक यांच्यात सतत भांडणं होत असल्याने काजोल आपल्या नात्याबाबत अजयकडून अनेकवेळा सल्ला घेत असे. एकदा काजोल आणि कार्तिकच्या नात्याबाबत अजय आणि काजोल बोलत असताना करिश्माचा फोन आला. अजयशी फोनवर बोलताना त्याच्या रूममध्ये कोणीतरी महिला असल्याचे तिच्या लक्षात आले आणि त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता आणि त्यानंतर काहीच महिन्यांनी अजय आणि काजोल यांनी लग्न केले. 


Web Title: Karisma Kapoor Birthday Special: Karisma Kapoor was not talking with Raveena Tondon Due to Ajay Devgn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.