करिष्मा कपूरने नुकतेच ‘डान्स इंडिया डान्स : बॅटल ऑफ द चॅम्पियन्स’कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी करिष्माने धमाकेदार डान्स करत सा-यांची मनं जिंकली. करिष्मा सिनेमापासून लांब असली तरी ती रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावताना दिसते. यावेळी करिष्मा थिरकताना पाहून रसिकांना करिष्माचा 90च्या दशकातली त्यावेळची करिष्मा आठवली असणार हे मात्र नक्की. करिष्माने सा-यां स्पर्धकांचाही परफॉर्मन्स पाहून त्यांना चांगल्या टीप्सही दिल्या. तसेच यावेळी तिला बहीण करिनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

करिष्माला आपली बहीण बेबो (म्हणजे करीना कपूर-खान) हिच्या बालपणीच्या काही आठवणी सांगण्याची विनंती करण्यात आली. तेव्हा करिष्माने करीनाबद्दल सांगितलेल्या खट्याळ आठवणींनी सर्वजण थक्क झाले. करिष्मा कपूर म्हणाली, “शाळेत असताना मी अगदी संयमी विद्यार्थिनी होते आणि सर्वजण मला ‘मिस गुडी टू शूज’  म्हणून बोलायचे.  

मी अगदी शिस्तप्रिय मुलगी होते, पण करीना एकदम पटाखा होती. ती खूपच खट्याळ होती आणि ती नेहमी कुठेतरी पळून जात असे आणि आम्ही तिला शोधत फिरत असू. मी अगदी साधी असून माझ्या अगदी उलट करीना आहे. पण ते म्हणतात ना, विरुध्द स्वभावाच्या व्यक्तींना एकमेकांबद्दल जास्त प्रेम  वाटतं. म्हणूनच आम्ही दोघी एकमेकींच्या अगदी जवळ आहोत.”

लोलो आणि बेबो या बहिणींमधील हे प्रेमाचे नाते निश्चितच प्रशंसनीय म्हटले पाहिजे. याशिवाय या वीकेण्डच्या भागात अनरिअल क्र्यू या स्पर्धकांकडून प्रेक्षकांना ‘मार डाला’  या गाण्यावर, तर ‘इन आँखों की मस्ती में’  या गाण्यावर सोल क्वीन यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळेल. 


Web Title: Karishma Kapoor Shocking Statement On Sister Kareena Kapoor, Read Details
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.