ठळक मुद्देकरिश्माने तिच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत तिच्यासोबत तिचे बाबा म्हणजेच रणधीर कपूर यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत तिने पापज गर्ल असे कॅप्शन लिहिले आहे.

करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोघांनीही बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. करिश्माने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला असून या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

करिश्माने तिच्या बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोत तिच्यासोबत तिचे बाबा म्हणजेच रणधीर कपूर यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत तिने पापज गर्ल असे कॅप्शन लिहिले आहे. या फोटोत चिमुकली करिश्मा खूपच गोंडस दिसत असून तिचा ड्रेस आणि विशेषतः तिची स्माईल प्रेक्षकांना आवडत आहे. या फोटोवर सामान्य लोक कमेंट करत आहेत. पण त्याचसोबत सेलिब्रेटीदेखील करिश्माच्या या फोटोच्या प्रेमात पडले आहेत. करिश्माच्या चित्रपटसृष्टीतील अगदी जवळच्या मैत्रिणी मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांनी या फोटोवर लगेचच कमेंट केली आहे. अमृताने तू खूपच क्यूट दिसत असल्याचे लिहिले आहे तर मलायकाने हार्टचे इमोजी या फोटोच्या खाली पोस्ट केले आहे. 

करिश्मा कपूरने केवळ १७ व्या वर्षी प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील करिश्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळाली नव्हती. त्यानंतर तिने पोलिस ऑफिसर, जागृती असे अनेक फ्लॉप चित्रपट दिले. पण जीगर या चित्रपटानंतर तिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने राजा बाबू, अंदाज अपना अपना, कुली नं १, राजा हिंदुस्तानी, जुडवा, दिल तो पागल है, बिवी नं १ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.

२००६ मध्ये करिश्माने मेरे जीवन साथी या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर अनेक वर्षं ती अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली. तिने डेन्जर्स इश्क या चित्रपटाद्वारे काही वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता. मात्र गेल्या सात वर्षांपासून ती कोणत्याच चित्रपटात झळकलेली नाहीये. आता अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या वेबसिरिजद्वारे ती अभिनयक्षेत्रात पुनरागमन करत आहे.

Web Title: Kareena Or Karisma With Randhir Kapoor? Guess Who's 'Papa's Girl' In This Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.