करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 12:34 PM2019-02-27T12:34:19+5:302019-02-27T12:42:21+5:30

करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून ती या चित्रपटानंतर तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

Kareena Kapoor Khan LEAKS her role details about Takht | करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देकरिना या चित्रपटात जहाँआरा बेगम ही व्यक्तिरेखा साकारत असून जहाँआरा ही एक मुघल काळातील राजकुमारी असून मुघल बादशहा शाह जहाँ यांची ती मोठी मुलगी होती.सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत असून या भूमिकेसाठी ती उर्दू शिकत आहे. या चित्रपटात औरंगजेब आणि दारा शिकोह या दोन मुघल राजांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 

करण जोहरच्यातख्त या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रणवीर सिंग, अलिया भट, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर, करिना कपूर अशी भलीमोठी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली असून या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाची कथा ही मुघल काळातील असून या सगळ्याच कलाकारांना एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचा लूक हा खूप वेगळा असणार असून चित्रपटाची टीम गेल्या कित्येक महिन्यांपासून यावर काम करत आहे.

करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत गुड न्यूज या चित्रपटाचे चित्रीकरण करत असून ती या चित्रपटानंतर तख्त या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. करिनाची या चित्रपटातील भूमिका काय असणार याविषयी तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. ती या चित्रपटात जहाँआरा बेगम ही व्यक्तिरेखा साकारत असून जहाँआरा ही एक मुघल काळातील राजकुमारी असून मुघल बादशहा शाह जहाँ यांची ती मोठी मुलगी होती. या चित्रपटातील तिची भूमिका आजवरच्या तिच्या सगळ्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. ही भूमिका ऐकल्यानंतर या भूमिकेच्याच मी प्रेमात पडले असे करिना सांगते. सध्या ती या भूमिकेवर प्रचंड मेहनत घेत असून या भूमिकेसाठी ती उर्दू शिकत आहे. या चित्रपटात औरंगजेब आणि दारा शिकोह या दोन मुघल राजांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. 

करण जोहरने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहाना, माय नेम इज खान, स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसला दिले आहेत. करणने अनेक चित्रपट दिग्दर्शित केले असले तरी करणसाठी तख्त हा चित्रपट खूपच खास आहे. त्याचा हा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. या चित्रपटाच्या कथेवर तो जवळजवळ दोन वर्षं काम करत होता. 

Web Title: Kareena Kapoor Khan LEAKS her role details about Takht

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.