करिना कपूरला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 10:22 AM2021-02-19T10:22:04+5:302021-02-19T10:23:12+5:30

करिना कपूर कुठल्याही क्षणी आई झाल्याची गुडन्यूज शेअर करू शकते. बेबो दुस-यांदा आई होणार आहे.

kareena kapoor khan and saif ali khan to be blessed with baby girl says astrologer | करिना कपूरला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

करिना कपूरला मुलगा होणार की मुलगी? ज्योतिषाने केली भविष्यवाणी

googlenewsNext
ठळक मुद्दे करीनाची डिलेव्हरी लंडनमध्ये होईल, अशीही चर्चा आहे. मात्र तूर्तास तरी बेबो घरी आहे.  

करिना कपूर कुठल्याही क्षणी आई झाल्याची गुडन्यूज शेअर करू शकते. बेबो दुस-यांदा आई होणार आहे. तिच्यासोबत तिचे कुटुंबीय आणि चाहतेही बाळाच्या स्वागतासाठी आतूर आहेत. साहजिकच करिनाला मुलगा होतो की मुलगी हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. तूर्तास एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली आहे.
अनुष्का शर्मा व विराट कोहलीला मुलगी होणार, अशी भविष्यवाणी करणा-या ज्योतिषानेच आता करिनाच्या येणा-या बाळाबद्दलही भविष्यवाणी केली आहे.

या भविष्यवाणीनुसार, करिना यावेळी कन्यारत्नाला जन्म देणार आहे. विरूष्काच्या बाळाबद्दलही या ज्योतिषाची भविष्यवाणी अगदी खरी ठरली. आता बेबोबद्दलची या ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरते की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
करिनाने गत ऑगस्ट महिन्यात दुस-यांदा आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती.  गेल्याच महिन्यात करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी बेबोची ड्यू डेट 20 डिसेंबर असल्याचा खुलासा केला होता.

एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘करीना हेल्दी असून बाळाचीही चांगली वाढ होतेय. 20 डिसेंबर ड्यू डेट आहे. डिलेवरी नॉर्मल होणार की सिजेरियन, याची मला कल्पना नाही. ड्यू डेट जवळ आल्यानंतर डॉक्टर तो निर्णय घेणार आहेत. हे सर्व काही करीनाच्या तब्येतीवर अवलंबून असेल. सध्या आम्ही येणा-या नवीन पाहुण्याची आतुरतेने वाट बघत आहोत.’   करीनाची डिलेव्हरी लंडनमध्ये होईल, अशीही चर्चा आहे. मात्र तूर्तास तरी बेबो घरी आहे.  

Web Title: kareena kapoor khan and saif ali khan to be blessed with baby girl says astrologer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.