अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली बॉलिवूडची बेबो  अर्थात  बेगम करिना कपूर तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की आपल्या फिटनेसमुळे ती अनेक चांगल्या चांगल्या सेलिब्रेटींना   कडवी टक्कर देते. बॉलिवूडमधील झिरो फिगर असलेली एकमेव अभिनेत्री म्हणून करिना कपूर ओळखली जाते. आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते.


झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलेय ते सर्वांना ठाऊकच आहे. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी करिना  बरीच मेहनत घेते. करिनाला साधं शुद्ध भारतीय जेवण आवडतं. इतकंच नव्हे तर खाण्या पिण्यामध्येही ती काटेकोरपणे शिस्त बाळगते.

 

 काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत ती योगा करताना पाहायला मिळते. तिच्या या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. त्यामुळे कितीही बिझी शेड्युअल असले तरी ती योगा किंवा जिम मध्ये वर्कआऊट करण्याकडे जास्त लक्ष देते.  सोशल करिनाचे मीडियावरील  हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देतील हे मात्र नक्की.

करिना कपूर आपल्या डान्स मूव्ह्स, सेक्सी आउटफिट्स आणि क्यूट स्माइलमुळे नेहमीच चर्चेत असते. तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच करिनाने वर्कआउट आणि डाएटचा आधार घेऊन स्लिम अॅन्ड फिट बनवलं आहे.


Web Title: Kareena Kapoor Fitness Workout, Diet Plan and Yoga Exercises
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.