पार्टीत ड्रग्ज? करण जोहरच्या घरी झालेल्या ‘त्या’ पार्टीसंदर्भात NCB कडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:59 PM2020-09-16T16:59:36+5:302020-09-16T17:00:54+5:30

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी गेल्यावर्षी झालेली बॉलिवूड गँगची एक पार्टी चांगलीच वादात सापडली होती.

karan johar party video politician files complaint with ncb against deepika padukone vicky kaushal malaika arora | पार्टीत ड्रग्ज? करण जोहरच्या घरी झालेल्या ‘त्या’ पार्टीसंदर्भात NCB कडे तक्रार

पार्टीत ड्रग्ज? करण जोहरच्या घरी झालेल्या ‘त्या’ पार्टीसंदर्भात NCB कडे तक्रार

googlenewsNext
ठळक मुद्दे ट्विटसोबत सिरसा यांनी एक पत्रही जोडले आहे. या पत्रात यांनी करण जोहरच्या पार्टीला हजर असलेल्या सर्व बॉलिवूड स्टार्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी गेल्यावर्षी झालेली बॉलिवूड गँगची एक पार्टी चांगलीच वादात सापडली होती. या कथित ‘ड्रग्ज’ पार्टीला बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. आता करणच्या घरी झालेल्या या लेट नाईट पार्टीची ड्रग्ज अँगलने चौकशी करण्याची मागणी करत शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी एनसीबीकडे  तक्रार दाखल केली आहे.
मनजिंदर सिंग सिरसा यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली. ‘मी आज राकेश अस्थाना यांना नारकोटिक्स ब्युरो बीएसएफच्या दिल्ली येथील मुख्यालयी भेटलो. मी त्यांच्याकडे निर्माता करण जोहरविरोधात तक्रार दाखल केली. मुंबईत करण जोहरच्या घरी झालेल्या ड्रग्ज पार्टीच्या व्हिडीओची चौकशी व्हावी, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली,’ असे ट्विट सिरसा यांनी केले आहे.

या ट्विटसोबत सिरसा यांनी एक पत्रही जोडले आहे. या पत्रात यांनी करण जोहरच्या पार्टीला हजर असलेल्या सर्व बॉलिवूड स्टार्सची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात दीपिका पादुकोण, विकी कौशल, मलायका अरोरा, वरूण धवन, अर्जुन कपूर, शाहिद कपूर अशा सर्वांच्या नावाचा उल्लेख आहे. या पार्टीत बॉलिवूड कलाकार ड्रग्जचे सेवन करताना दिसल्याचा दावाही सिरसा यांनी पत्रात केला आहे.

करण जोहरच्या घरी गेल्यावर्षी ही पार्टी झाली होती...

दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे अनेकजण या पार्टीला हजर होते. करणने स्वत: या पार्टीचा व्हिडीओ शेअर केला होता आणि  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले. व्हिडीओत सर्व स्टार्स ज्या स्थितीत दिसत आहेत, त्यावरून ते सगळे नशेत तर्र असल्याचे युजर्सने म्हणणे होते़ व्हिडीओत अभिनेता विकी कौशलला पाहून तर त्याने ड्रग्ज घेतली असावी, अशी शक्यता युजर्सनी व्यक्त केली होती. यानंतर सोशल मीडियावर विकी कौशलला चाहत्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला होता. अनेकांनी विकी कौशलचा फोटो शेअर करून विकी दारूच्या नशेत आहे की ड्रग्जच्या असा प्रश्न उपस्थित केला होता. कॅमेरा समोर येताच विकी आपले नाक स्वच्छ करताना दिसतो, यावरून अनेकांनी तो ड्रग्जच्या नशेत असल्याचा दावा केला होता.

काय होते व्हिडीओ

करण जोहरने हा लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये सगळे स्टार्स एकत्र बसलेले दिसतात. सर्वप्रथम या व्हिडीओत दीपिका दिसते. अर्थात तिचा हबी रणवीर सिंग कुठेही दिसत नाही. पाठोपाठ दीपिकाचा एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरही या व्हिडीओत दिसतो.   मलायका अरोरा मात्र तिचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत दिसते. वरूण धवन याची गर्लफ्रेन्ड नताशा दलाल ही सुद्धा या व्हिडीओ दिसते. झोया अख्तर आणि अयान मुखर्जी हेही व्हिडीओत दिसतात. विकी कौशल यात नाक स्वच्छ करताना दिसतो. करण जोहरने हा व्हिडिओ शेअर करताना ‘सॅटरडे नाईट व्हाईब्स’ असे कॅप्शन दिले होते. 

करणने नाकारले होते ड्रग्जचे आरोप
पत्रकार राजीव मसंद यांच्या शोमध्ये करण ही पार्टी आणि त्याच्या व्हिडीओवर बोलला होता़ ‘त्या दिवशी पार्टीत अनेक स्टार्स हजर होते. या सर्वांनी प्रचंड कष्टाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आठवडाभर काम केल्यानंतर हे सगळेजण एन्जॉय करत होते. पार्टीत ड्रग्ज असती तर मी हा व्हिडीओ शेअर केला असता का? मी इतका मूर्ख नक्कीच नाही. विकी कौशल नाक स्वच्छ करताना दिसला म्हणजे त्याचा अर्थ तो ड्रग्ज घेत होता, असा होतो का? एखादी व्यक्ती आपला फोन खिशात टाकत असेल तर तो ड्रग्ज लपवत असेल असा अर्थ निघतो का? असे सवालही करणने यावेळी केले. लाईटच्या रिफ्लेक्शन पडले आणि लोकांनी त्याला ड्रग्ज ठरवले. विकी कौशल त्यावेळी डेंग्यूच्या आजारातून बरा होत होता. तो गरम पाणी आणि लिंबू घेत होता. व्हिडीओ बनवण्याच्या 5 मिनिटांआधीपर्यंत माझी आई त्यादिवशी तिथे हजर होती. माझ्या कुटुंबात फक्त आणि फक्त आनंद वाटला जातो. मित्रांसोबत बसून गप्पा केल्या जातात, चांगले संगीत ऐकले जाते. आम्ही त्यादिवशी वेगवेगळ्या पक्वानांचा आस्वाद घेतला, मस्ती केली, इतकेच, असेही करण म्हणाला होता. 

Web Title: karan johar party video politician files complaint with ncb against deepika padukone vicky kaushal malaika arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.