ठळक मुद्देप्रबल गुरंग हा एक प्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. अलीकडे मेट गाला या इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये ईशा अंबानीने प्रबलने डिझाईन केलेला गाऊन घातला होता.

बॉलिवूडचा स्टाइलिश दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याला काल (25 मे)अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. पण फॅशन डिझाईनर प्रबल गुरंग याने करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली  आणि भलतीच चर्चा सुरु झाली. होय, प्रबलने करणसोबतचा एक फोटो शेअर केला. सोबत एक कॅप्शन. हे कॅप्शन अनेकांनी वाचले आणि चर्चेचे पेव फुटले.
होय, या फोटोत प्रबल आणि करण दोघेही एकमेकांना खेटून उभे आहेत. करणचा एक हात प्रबलच्या गळ्यात असल्याचे दिसतेय. या फोटोला प्रबलने ‘प्यार किया तो डरना क्या’ असे कॅप्शन दिले. या कॅप्शननंतर करण हा प्रबलला डेट करत असल्याच्या, म्हणजेच दोघांत प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा रंगली.

विशेष म्हणजे, प्रबल व करण या दोघांनी न्यूयॉर्कमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे आणि याच ठिकाणच्या एका हॉटेलमध्ये दोघेही थांबल्याची चर्चाही रंगली.  यानंतर सोशल मीडिया युजर्सनी यानंतर करणवर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. अखेर करणला खुलासा करणे भाग पडले.

त्याने काय खुलासा करावा, तर त्याने यावर मजेशीर उत्तर दिले. ‘कंट्रोल युअरसेल्फ भैय्या,’ असे करणने लिहिले. करण व प्रबलच्या या फोटोला आत्तापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे.


करणचा फोटो शेअर करत, ‘प्यार किया तो डरना क्या’ असे लिहिणारा प्रबल गुरंग हा एक प्रसिद्ध फॅशन डिझाईनर आहे. अलीकडे मेट गाला या इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये ईशा अंबानीने प्रबलने डिझाईन केलेला गाऊन घातला होता.
करणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे धर्मा प्रॉडक्शनचे कलंक व स्टुडंट आॅफ द ईअर 2 हे दोन सिनेमे फ्लॉप झालेत. या दोन्ही चित्रपटानंतर करण ‘तख्त’ या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.


Web Title: karan johar dating prabal gurung speculation strong after viral picture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.