‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 02:11 PM2019-08-26T14:11:35+5:302019-08-26T14:12:55+5:30

‘बाहुबली’ प्रभासचा ‘साहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.  सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला.

the kapil sharma show prabhas revealed the meaning of saaho | ‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

‘साहो’ अन् प्रभासचे खुलासे...; काय होतो ‘साहो’चा अर्थ?

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होतोय.

‘बाहुबली’ प्रभासचासाहो’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय.  सध्या प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान प्रभासने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आणि ‘साहो’चा अर्थ कळला.

काय होतो ‘साहो’चा अर्थ
होय, कपिल शर्माने प्रभास व श्रद्धा यांच्यासोबत धम्माल मस्ती केली. शिवाय त्यांना अनेक इंटरेस्टिंग प्रश्नही विचारले. याच क्रमात कपिलने प्रभासला ‘साहो’चा अर्थ विचारला. ‘साहो’ याचा अर्थ काय होतो, असे कपिलने विचारले. यावर प्रभासने दिलेले उत्तर ऐकून अर्चना पूरनसिंग बरीच अवाक् झालेली दिसली. संस्कृतमध्ये ‘साहो’ म्हणजे ‘जय हो’ असे होते, असे प्रभासने सांगितले.

किती आहे बजेट
या चित्रपटाच्या बजेटबद्दलही प्रभासने खुलासा केला. या चित्रपटाचा बजेट 350 कोटी रूपये असल्याचे प्रभासने सांगितले.
प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होतोय. चित्रपटाचा ट्रेलर कधीच रिलीज झालाय. यात प्रभास आणि श्रद्धा जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसले होते. अबुधाबीच्या रिअल लोकेशनवर या चित्रपटाचे बहुतांश शूटींग झाले. यामुळे चित्रपटाचा बजेट वाढला.

काय आहे प्रभासचे खरे नाव
कपिल शर्माने शोमध्ये गेस्ट म्हणून आलेल्या प्रभासची त्याच्या ख-या नावाने ओळख करून दिली. ‘प्लीज वेलकम व्यंकटेश सत्यनारायणा प्रभास राजू उप्पलपत्ती,’ असे कपिल म्हणाला. सोबतच, ही पाच व्यक्तिंची नावे नाहीत तर एका व्यक्तिचे पूर्ण नाव आहे आणि ही एकटी व्यक्ति पाच स्टार्सच्या बरोबर आहे, असे कपिल म्हणाला.

तर इंटरव्ह्यू बंद करेल
देशाचा पंतप्रधान झालास तर सर्वप्रथम काय करशील? असा प्रश्न कपिलने प्रभासला केला. यावर सर्वप्रथम इंडस्ट्रीतील इंटरव्ह्यू बंद करेल, असे प्रभास म्हणाला.

Web Title: the kapil sharma show prabhas revealed the meaning of saaho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.