ठळक मुद्दे१२ डिसेंबर २०१८ रोजी कपिलने त्याची बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली होती.

कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्याकडे सध्या दोन दोन ‘गुड न्यूज’ आहेत.   पहिली गुड न्यूज म्हणजे, नुकताच एक विक्रम नोंदवत,कपिल देशातील सर्वात मोठा ‘कॉमेडी किंग’ बनलाय. होय,कपिल शर्माच्या नावाची नोंद आता ‘वर्ल्ड बुक ऑफ  रेकॉर्ड्स लंडन’मध्ये झाली आहे. कपिलला नुकतेच ‘वर्ल्ड बुक ऑफ लंडन’कडून भारतातील सर्वाधिक पसंती असलेला स्टँड-अप कॉमेडियन म्हणून सन्मानित करण्यात आले. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ हिच्या एका फॅन पेजवरुन ‘वर्ल्ड बुक ऑफ  रेकॉर्ड्स लंडन’ने दिलेले सर्टिफिकेट इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले. यानंतर कपिलच्या चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. यापूर्वी कपिलला ‘इंडियन ऑफ द इयर’ आणि ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ‘फोर्ब्स इंडिया’मध्ये सर्वाधिक कमाई करणा-या टीव्ही अभिनेत्यांमध्येही त्याचा सामावेश आहे.


दुसरी गुड न्यूज म्हणजे, कपिल शर्मा लवकरच बाप बनणार असल्याचे कळतेय.  कपिलची पत्नी गिन्नी प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. इंडिया टीव्ही शो ‘सास बहू और सस्पेन्स’ने गिन्नी प्रेग्नंट असल्याची बातमी दिली आहे. अर्थात कपिलने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. १२ डिसेंबर २०१८ रोजी कपिलने त्याची बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली होती.


कपिलने २००७ मध्ये कॉमेडी शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या शोचा विजेता बनत कपिलने अपार लोकप्रियता मिळवली होती. यानंतर २०१३ मध्ये  त्याचा ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ लाँच केला होता. त्यानंतर कपिलने ‘किस किस को प्यार करू’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यूही केला होता.  कपिलचा ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो लोकप्रियतेच्या शिखरावर असताना कलाकारांमध्ये झालेल्या अंतर्गत वादांमुळे बंद पडला होता. यानंतर कपिल डिप्रेशनमध्ये गेल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. पण यानंतर काही महिन्यांपूर्वीच कपिलने दव्या दमाने  पुन्हा एकदा आपल्या शोद्वारे छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली.


Web Title: the kapil sharma show kapil sharma gets honoured by world book of records london
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.