कनिका कपूरने सोशल मीडियावरून डिलीट केली ती पोस्ट, काय आहे त्यामागचे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:28 AM2020-03-26T11:28:19+5:302020-03-26T11:31:58+5:30

कनिकाने इन्स्टाग्रामला एक पोस्ट लिहित तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिच्या फॅन्सना सांगितले होते.

Kanika Kapoor deletes Instagram post where she had revealed about testing positive for Covid-19 PSC | कनिका कपूरने सोशल मीडियावरून डिलीट केली ती पोस्ट, काय आहे त्यामागचे कारण?

कनिका कपूरने सोशल मीडियावरून डिलीट केली ती पोस्ट, काय आहे त्यामागचे कारण?

googlenewsNext
ठळक मुद्देकनिकाने ही पोस्ट डीलिट का केली यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

कनिका कपूरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिनींनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर त्याच दिवशी कनिकाने देखील इन्स्टाग्रामला एक पोस्ट लिहित या गोष्टीला दुजोरा दिला होता. पण आता कनिकाने सोशल मीडियावरून ती पोस्ट डीलिट केली आहे. कनिकाने ही पोस्ट डीलिट का केली यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

कनिका लंडनहून भारतात परतल्यानंतर तिने तीन पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले होते. या पार्टींमध्ये ती अनेक लोकांना भेटली होती. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले होते. या सगळ्यामुळे तिच्यावर लोकांनी प्रचंड टीका केली होती. एवढीच नव्हे तर तिच्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या वादामुळे तिने सोशल मीडियावरील पोस्ट डीलिट केली असेल असा अंदाज लावला जात आहे.

कनिकाने इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक पोस्ट लिहिली होती आणि त्याद्वारे सांगितले होते की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.

Web Title: Kanika Kapoor deletes Instagram post where she had revealed about testing positive for Covid-19 PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.