बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीवर का आली 600 रुपयांची साडी नेसण्याची वेळ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 11:13 AM2019-08-20T11:13:10+5:302019-08-20T11:24:36+5:30

बॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणून हिची ओळख आहे. ऐवढेच नाही तर फॅशन आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं.

kangna ranaut wore saree worth rupees 600 | बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीवर का आली 600 रुपयांची साडी नेसण्याची वेळ ?

बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रीवर का आली 600 रुपयांची साडी नेसण्याची वेळ ?

googlenewsNext

बॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री म्हणून हिची ओळख आहे. ऐवढेच नाही तर फॅशन आयकॉन म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तुम्हाला कळलेच असले आम्ही कोणाबदल बोलतोय ते. आम्ही बोलतोय वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत राहिणारी अभिनेत्री कंगना राणौतबाबत. कंगना नेहमीच स्टायलिश दिसण्यासाठी महागडे कपडे आणि एक्ससरिज वापरत असते. मात्र यावेळी काहीसं उलट झालं आहे.



कंगना राणौत नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी परिधान केलेल्या साडीत कंगाना खूप सुंदर दिसत होती.खास गोष्ट ही आहे की यावेळी कंगनाने जी साडी परिधान केली होती याची किंमत केवळ 600 रुपये होती. तुम्हाला ऐकून कदाचित आर्श्चय वाटत असेल. मात्र कंगनाची बहिण रंगोलीने खुद हा खुलासा केला आहे. रंगोलीने ट्वीट केले आहे की, ''जयपूरला जाताना कंगानाने जी साडी परिधान केली आहे तिची किंमत केवळ 600 रुपये आहे. ही साडी कंगानने कोलकत्त्यावरुन विकत घेतली आहे. साडी खरेदी करताना तिची किंमत ऐकून कंगना हैराण झाली. कारण  ऑग्रेनिक कॉटन पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या साडीसाठी अनेक लोकांनी मेहनत घेतली आहे. मात्र त्याच्या तुलनेत त्यांना मोबदला तेवढा मिळत नाही.''


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कंगना काही दिवसांपूर्वीच 'जजमेंटल है क्या' सिनेमात दिसली होती. यानंतर ती पंगा सिनेमात दिसणार आहे तसेच ती जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे. या भूमिका साकारण्यासाठी कंगना तमिळ भाषेचे धडे गिरवणार असल्याचे तिने सांगितले.

  जयललिता यांची भूमिका समजण्यासाठी कंगना तमिळ शिकणार आहे.एएल विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कवी विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. कंगना या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तब्बल कंगनाने २४ कोटी रूपयांची भरभक्कम फी मागितली असल्याची माहिती आहे. 

 

Web Title: kangna ranaut wore saree worth rupees 600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.