त्या दिवसांपासून कंगणावरचा विश्वासच उडाला,अभिनेत्रीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 06:56 PM2021-02-11T18:56:57+5:302021-02-11T19:00:31+5:30

अभिनेत्री माल्वी मल्होत्रा तिच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

kanganaranaut is a lier , only shouts and do nothing actress malvi malhotra alleges | त्या दिवसांपासून कंगणावरचा विश्वासच उडाला,अभिनेत्रीचा आरोप

त्या दिवसांपासून कंगणावरचा विश्वासच उडाला,अभिनेत्रीचा आरोप

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून कंगणा राणौत वेगवगेळ्या मुद्द्यावर गरज नसतानाही आपली मतं मांडताना दिसत आहे. त्यामुळे कंगणाला हवी तितकी प्रसिद्धी तर मिळतेय मात्र इतरांसाठी ती नुसती डोक्याला तापच ठरत आहे.अनेक अभिनेत्री तिच्या मतांवर नाराजी व्यक्त करताना दिसतात. अभिनेत्री माल्वी मल्होत्राने देखील कंगणाची पोल खोल करत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 


माल्वी मल्होत्रासोबत घडलेल्या घटनेवर कंगनानं ट्विट केलं होतं आणि ती म्हणाली होती की, हे फिल्म इंडस्ट्रीचं सत्य आहे. छोट्या शहरतून आलेल्या कलाकारांसोबत असं घडतं ज्यांच्याकडे कनेक्शन किंवा योग्य चॅनेल नाहीत त्यांना हे सहन करावं लागतं.

अभिनेत्री माल्वी मल्होत्रा तिच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिच्या म्हणण्यानुसार कंगना राणौतने मदतीसाठी फक्त ट्विट केलं परंतु तिला मदत केली नाही. तेव्हा अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने तिला मदत केली होती. त्यामुळे कंगणावरचा विश्वाचच उडाल्याचे तिने म्हणणे आहे.

माल्वीचं म्हणणं आहे की, हॉस्पिटमध्ये असताना मला प्रचंड विश्वास होता की मदतीसाठी नक्कीच कंगणा काही तरी करेल. मात्र माझी मदत केली नाही.  त्यावेळेस तिने डॉक्टरांच्या मदतीने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. कंगनाने तो व्हिडिओ पाहून ट्विटसुद्धा केलं की, ती माल्वीला मदत करेल तिच्या बाजूने उभी राहील. पण तिने असं काहीही केलं नाही.याउलट माल्वीच्या मदतीला उर्मिला मातोंडकरच धावून आली. त्या दिवसांपासून कंगणावरचा विश्वास पूर्ण संपला. 


सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कंगना तर कंगनाचे प्रत्येक ट्विट चर्चेत होते. महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा, बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण, आणि आता शेतकरी आंदोलनावर ती ट्विटरच्या माध्यमातूनच व्यक्त झाली. यादरम्यान तिच्या अनेक ट्विटनी वादही ओढवून घेतले. आता मात्र कंगनाची टिवटिव थांबणार आहे. होय, ट्विटरवर व्यक्त होणारी कंगना आता ट्विटरला रामराम ठोकणार आहे. ट्विटरवरूनच खुद्द तिनेही ही माहिती दिली आहे.

Web Title: kanganaranaut is a lier , only shouts and do nothing actress malvi malhotra alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.