OMG: कंगणा राणौतही देणार Good News ? फोटो पाहून चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 11:43 AM2021-06-11T11:43:52+5:302021-06-11T11:49:46+5:30

कंगणा राणौतला पाहून चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला आहे. फोटोत कंगणाचे वजन वाढलेले दिसतंय. पोटही प्रेग्नंट असल्याप्रमाणे बाहेर आलंय.

Kangana Ranaut's recent pic with Baby bump is viral, is she pregnant? | OMG: कंगणा राणौतही देणार Good News ? फोटो पाहून चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

OMG: कंगणा राणौतही देणार Good News ? फोटो पाहून चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का

googlenewsNext

सेलिब्रिटी मंडळी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मग ते स्वतःविषयीचं एखादं कारण असो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीबाबतची गोष्ट. ते नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. कंगणा राणौत सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत.

 

कंगणाच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची रसिकांमध्ये उत्सुकता असते. तिच्या अभिनयाच्या जोरावरच आज तिने इंडस्ट्रीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नेहमीच ती तिच्या बेधडक वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असते हे जगजाहीर आहे. असा कोणताच मुद्दा नाही ज्यावर कंगणा आपले विचार मांडत नाही. कोणत्याही मुद्द्यावर कंगणा आपले मत मांडत चर्चेत असते. आता कंगणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यासाठी कारणीभूत ठरला आहे तिचा हा खास फोटो. 

एरव्ही तिचा प्रत्येक अंदाज पाहून चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत आपली पसंती देत असतात. यावेळी मात्र कंगणाला पाहून चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला आहे. फोटोत कंगणाचे वजन वाढलेले दिसतंय. पोटही प्रेग्नंट असल्याप्रमाणे बाहेर आलंय. कंगणाला पाहून ती प्रेग्नंट असल्याचे चाहत्यांना वाटतंय. अनेकांनी हा फोटो पाहून तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगत आहे. वारंवार तिचा हा फोटो पाहिला जात आहे.आता कंगणाचा बदललेला लूक पाहून तिच्या आगामी सिनेमातला तर हा लूक नाही ना अशाही चर्चा पाहायला मिळत आहे. 

बॉलिवूडमध्ये लग्न करण्यापूर्वी प्रेग्नेंट राहिलेल्या अभिनेत्रींची मोठी यादी आहे. बहूधा अभिनेत्री त्यांच्या प्रेग्नेंसीच्या गोष्टी लपवून गुपचुप लग्नगाठीत अडकतात. त्यासाठी त्या अनेक कारणे देतात, मात्र सत्य काही वेगळेच असते. खरे पाहता अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नसीबद्दल कुणाला कळू नये, यासाठी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांपासून लग्नाआधीच प्रेग्नंट असलेल्या अभिनेत्रींच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे चंदेरी दुनियेत कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे कंगणाला पाहून चाहत्यांनी अशाचप्रकारे तर्कवितर्क लावलायला सुरुवात केली आहे. तुर्तास हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. 

Web Title: Kangana Ranaut's recent pic with Baby bump is viral, is she pregnant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.