- म्हणून कंगना राणौतने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 11:04 AM2021-05-03T11:04:36+5:302021-05-03T11:07:23+5:30

होय, साऊथ अ‍ॅक्ट्रेस सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा विद्या बालनआधी कंगनाला ऑफर केला गेला होता. 

kangana ranaut was offered the dirty picture film before vidya balan actress said no | - म्हणून कंगना राणौतने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

- म्हणून कंगना राणौतने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा थलायवी हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

विद्या बालनचा (Vidya Balan)  ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण काय तर कंगना राणौत (Kangana Ranaut) . होय, साऊथ अ‍ॅक्ट्रेस सिल्क स्मिताच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा विद्या बालनआधी कंगनाला ऑफर केला गेला होता. अर्थात चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर कंगनाने या चित्रपटास नकार दिला होता.  का? तर एका ताज्या मुलाखतीत कंगनाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) सुपरडुपर हिट ठरला. अगदी विद्या बालनला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यामुळे हा सिनेमा सोडल्याचा पश्चाताप होतो का? असा सवाल कंगनाला या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अजिबात नाही, असे उत्तर कंगनाने दिले. (Kangana Ranaut was offered The Dirty Picture film before Vidya Balan )

यामागचे कारणही तिने स्पष्ट केले. ‘द डर्टी पिक्चर’ माझ्याकडे आला तेव्हा यात फार काही पोटेन्शिअल दिसले नाही.  त्यामुळे मी हा सिनेमा नाकारला होता. पण तो नाकारण्याचा मला अजिबात पश्चाताप नाही. विद्याने यात शानदार अभिनय केला आहे. मला नाही वाटत की, मी तिच्यापेक्षा उत्तम अभिनय करू शकले असते, असे ती म्हणाली.

मी आज टॉपची अभिनेत्री आहे. मी कधीच राजकुमार हिरानी, संजय लीला भन्साळी, यशराज किंवा धर्मा प्रॉडक्शनचे सिनेमे केले नाहीत. कधीही खान अभिनेत्यांसोबत काम केले नाही. तरीही मी आज आघाडीची अभिनेत्री आहे. हा एका केस स्टडीचा विषय आहे. डर्टी पिक्चर चालेले, हिट होईल, असे मला त्याक्षणी वाटले नव्हते. पण तो न केल्याचा पश्चाताप मुळीच नाही, असेही कंगनाने यावेळी सांगितले.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा थलायवी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाचे प्रदर्शन कोरोनामुळे लांबणीवर पडले आहे. याशिवाय येत्या काळात कंगनाचा धाकड आणि तेजस हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

 

Web Title: kangana ranaut was offered the dirty picture film before vidya balan actress said no

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.