भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

By तेजल गावडे | Published: November 13, 2020 02:04 PM2020-11-13T14:04:39+5:302020-11-13T14:05:22+5:30

भावाच्या लग्नात कंगना राणौत खूप ग्लॅमरस दिसत होती. यादरम्यान ती राजस्थानी ढोलच्या तालावर थिरकताना दिसली.

Kangana Ranaut was dancing on Rajasthani drum beats at her brother's wedding, video goes viral | भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौत भाऊ अक्षतच्या लग्नात एका वेगळ्यात अंदाजात पहायला मिळाली. तिने हे लग्न अविस्मरणीत बनवत प्रत्येक क्षण एन्जॉय करताना दिसली. यादरम्यान तिने ठुमके लगावून सर्वांची मने देखील जिंकली. कंगना हे लग्न अटेंड करण्यासाठी उदयपूरमध्ये आली आहे. कंगना रानौतच्या हजेरीने लग्नाला चारचाँद लागले आहेत. भाऊ अक्षत राणौत आणि भाभी रितु सागवानचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी कंगनाने कोणतीच कसर सोडली नाही.


कंगना राणौतच्या भावाचे लग्न उदयपूरमधील द लीला पॅलेसमध्ये पार पडले.

लग्नाच्या आधी संगीत सेरेमनी होती. त्यावेळी कंगना राणौतने फिल्मी गाण्यावर परफॉर्मन्स दिला. इतकेच नाही तर संगीत सेरेमनीमध्ये प्रसिद्ध लोकगीत केसरिया बालम आवों नी, पधारो म्हारे देश या गाण्यावरदेखील कंगनाच्या कुटुंबातील सदस्यांनी ठुमके लगावले.


काही दिवसांपूर्वी कंगनाचा छोटा भाऊ अक्षतला हळदी लावतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिले होते की, आज माझा भाऊ अक्षतच्या बधाईची काही फोटो, बधाई हिमाचलमधील परंपरा आहे जे लग्नाचे पहिले निमंत्रण मामाच्या घरी दिले जाते. अक्षतचे लग्न नोव्हेंबरमध्ये आहे आजपासून सर्वांना निमंत्रण दिले जाते त्यासाठी बधाई म्हटले जाते.

व्हिडीओत कंगनाच्या कुटुंबातील महिलांसोबत बहिण रंगोली चंडेलदेखील दिसते आहे. 
कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतेच थलाइवीचे शूटिंग शेड्यूल पूर्ण करून मनालीला परतली होती.

Web Title: Kangana Ranaut was dancing on Rajasthani drum beats at her brother's wedding, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.