मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्‍यांवर भडकली कंगना राणौत; म्हणाली, मी तुमचे अश्रू...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:16 PM2021-05-24T12:16:04+5:302021-05-24T12:19:24+5:30

वाराणसीतील डॉक्टरांनी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झालेले अख्ख्या देशाने पाहिले. आता यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया आली आहे.

kangana ranaut support pm narendra modi and shares post on his emotional statement | मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्‍यांवर भडकली कंगना राणौत; म्हणाली, मी तुमचे अश्रू...

मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्‍यांवर भडकली कंगना राणौत; म्हणाली, मी तुमचे अश्रू...

googlenewsNext
ठळक मुद्देगत 21 मे रोजी मोदींनी वाराणसीतील डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनामुळे जीव गमवावा लागणा-यांबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर झाले होते.

वाराणसीतील डॉक्टरांनी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) भावुक झालेले अख्ख्या देशाने पाहिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असताना कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना मोदींना गहिवरून आले. मात्र यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. बैठकीत भावुक होणे हा ठरवून केलेला कार्यक्रम होता, अशी टीका विरोधकांनी यानिमित्ताने केली. सोशल मीडियावरही त्यांच्या या भावुकतेची खिल्ली उडवली गेली. आता यावर कंगना राणौतची (Kangana Ranaut) प्रतिक्रिया आली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ‘अश्रू खरे होते वा खोटे... तुम्ही टिअर डिटेक्टर टेस्टमध्ये गुंतून राहणार आहात की दुस-याचे दु:ख बघून तळमळणा-या व्यक्तिच्या भावना स्वीकारणार आहात. वेदना असहनीय होतात तेव्हा त्या व्यक्त कराव्याच लागतात. हे दु:ख वाटावेच लागते.  मी तुमचे अश्रू स्वीकातेय... पंतप्रधान मोदीजी मी तुम्हाला तुमचे दु:ख शेअर करू देईऩ...प्रियभारतीयांनो प्रत्येक आशीर्वाद समस्या समजू नका. स्वत:चे अ‍ॅटिट्यूट आणि विचार स्वत: ठरवा, असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

गत 21 मे रोजी मोदींनी वाराणसीतील डॉक्टर्स, पॅरामेडिकल कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनामुळे जीव गमवावा लागणा-यांबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर झाले होते.
याआधी यूपीमध्ये मेंदू ज्वरामुळे हजारो लहानग्यांनी आपला जीव गमवला होता, त्यावरून एकदा त्यांना संसदेत रडू कोसळले होते. 

Web Title: kangana ranaut support pm narendra modi and shares post on his emotional statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.