kangana-ranaut-sister-rangoli-chandel-lashes-out-karan-johar-tweets | बी-टाऊनमधील ब्रेकअप-पॅचअपबाबतचा कंगनाची बहिण रंगोलीचा धक्कादायक खुलासा, करण जोहरवर साधला निशाणा
बी-टाऊनमधील ब्रेकअप-पॅचअपबाबतचा कंगनाची बहिण रंगोलीचा धक्कादायक खुलासा, करण जोहरवर साधला निशाणा


बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत व केजो म्हणजेच निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यामधील वादविवाद सर्वांच्याच परिचयाचे आहेत. त्यात कंगनाने करण जोहरवर नेपोटिझ्मचा आरोप केला होता. इतकेच नाही तर कंगनाने करणला मूव्ही माफिया असे संबोधले होते. कंगनानंतर आता तिची बहिण रंगोली चंडेल हिने एकानंतर एक ट्विट करत करण जोहरवर निशाणा साधला आहे. वादग्रस्त चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने ट्विट केले की, मला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरने ईशान खट्टरला धर्मा प्रोडक्शनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ईशान करणशी वाईट पद्धतीने वार्ता करत होता. त्यामुळे आता तो धर्मा प्रोडक्शन्सच्या कोणत्याही चित्रपटाचा हिस्सा नाही.


तर या ट्विटच्या उत्तरात रंगोलीने म्हटले की, करण जोहर ज्या कलाकारांना लाँच करतो त्यांच्या कमाईतील मोठा हिस्सा तो घेतो. याशिवाय काय परिधान केले पाहिजे आणि कोणासोबत झोपले पाहिजे हेदेखील तोच सांगतो. असे होतात ब्रेकअप आणि पॅच अप.
रंगोली पुढे सांगते की, मला माहित आहे की असे कित्येक हॉलिवूड प्रोडक्शनमध्ये असेच चालते. मात्र ब्रॅण्डच्या प्रसारानुसार ब्रेकअप आणि पॅचअप हे आत्मसन्मान असणारी व्यक्ती कधीच स्वीकार करणार नाही.
करियरची पर्वा न करता मनाची शांती जास्त महत्त्वाची आहे. अशा काही कृत्यामुळे स्वतःच्या नजरेतून पडाल आणि चार जास्त पैसे कमावले तरी त्याचे समाधान मिळणार नाही.


काही दिवसांपूर्वी रंगोलीने ट्विटरवर करण जोहरचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट स्टुडंट ऑफ द ईयर २वर तोंडसुख घेतले होते. तिने ट्विटमध्ये दावा केला होता की, धर्मा प्रोडक्शन्सची एक महिला कर्मचारी थिएटरमध्ये सिनेमा पाहण्याची विनंती करत होती आणि त्यांना सिनेमाबद्दल पॉझिटिव्ह रिव्यू द्यायला सांगत होती. 


रंगोलीने हाहाहा नॉटी पापा जो असेही ट्विटमध्ये म्हटले होते. यासोबतच करणने कंगनावर टीका केली होती. तो म्हणाला होता की, तिने एका व्यक्तीला बोलण्यासाठी ठेवले आहे आणि ती स्वतःचे काम करत आहे. यानंतर करणने कंगनाचे कौतूकदेखील केले होते की, कंगना आपल्याकडील अभिनेत्रींपैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.
रंगोलीने करण जोहरवर केलेल्या आरोपांवर करण काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: kangana-ranaut-sister-rangoli-chandel-lashes-out-karan-johar-tweets
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.