आता हे काय नवीन? कंगना राणौतचे हे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 10:29 AM2021-06-24T10:29:37+5:302021-06-24T10:30:39+5:30

होय, चेह-यावर रंग लावतानाचे काही फोटो कंगनाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे पाहून कंगनाचे चाहते थोडे बुचकळ्यात पडले आहेत.

kangana ranaut shares pictures of her starts prepping up to play indira gandhi in upcoming political drama | आता हे काय नवीन? कंगना राणौतचे हे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

आता हे काय नवीन? कंगना राणौतचे हे फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देकंगनाचा ‘थलाईवी’हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. या प्रोजेक्टसाठी दिवसरात्र जिममध्ये घाम गाळतेय. आता प्रोजेक्टवर प्रत्यक्ष काम सुरू झालेय. याचा पुरावा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला मिळेलच.
होय, चेह-यावर रंग लावतानाचे काही फोटो कंगनाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे पाहून कंगनाचे चाहते थोडे बुचकळ्यात पडले आहेत. बया चेह-यावर असा रंग का फासून घेतेय, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास, कंगना इंदिरा गांधी (Indira Gandhi) बनण्याची तयारी करतेय.

होय, कंगना लवकरच एका पॉलिटिकल ड्रामात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचीच ही तयारी आहे. त्याचेच फोटो तिने शेअर केलेत.  या फोटोंमध्ये तिच्या चेह-यावर प्लास्टिक लावून निळा रंग लावताना दिसत आहे.  
इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यास कंगना प्रचंड उत्सुक आहे. प्रत्येक भूमिकेच्या प्रवासाची सुंदर सुरुवात होते. आज आम्ही बॉडी, फेस स्कॅन व कास्टची तयारी सुरू केली. जेणेकरून लुक एकदम परफेक्ट येईल. अनेक अद्भूत कलाकार एक कल्पना स्क्रिनवर दाखवण्यासाठी एकत्र आले आहेत, असे कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हा सिनेमा इंदिरा गांधी यांचा बायोपिक नसल्याचे कंगनाने आधीच स्पष्ट केले होते. साई कबीर हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.
कंगनाचा ‘थलाईवी’हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या सिनेमातही ती दिसणार आहे.

Web Title: kangana ranaut shares pictures of her starts prepping up to play indira gandhi in upcoming political drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.