नवरात्रीवरून केलेल्या 'नॉटी' जाहिराती पाहून कंगना संतापली; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 05:58 PM2020-10-22T17:58:15+5:302020-10-22T18:30:11+5:30

‘इरॉस नाऊ’ला बायकॉट करण्याची मागणी अन् कंगनाचे ट्वीट

kangana ranaut compare ott platforms to porn website for streaming sensual content | नवरात्रीवरून केलेल्या 'नॉटी' जाहिराती पाहून कंगना संतापली; म्हणाली...

नवरात्रीवरून केलेल्या 'नॉटी' जाहिराती पाहून कंगना संतापली; म्हणाली...

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इरॉस नाऊ’ने नवरात्रीनिमित्त काही डबल मिनिंग पोस्ट शेअर केल्यात. या पोस्ट पाहून लोक भडकले. हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच ‘इरॉस नाऊ’ला माफी मागावी लागली.  

गुरूवारी सकाळी ट्वीटरवर  #BoycottErosNow ट्रेंड करू लागला. या हॅशटॅगसह नेटक-यांनी ‘इरॉस नाऊ’ला बायकॉट करण्याची मागणी लावून धरली.  पाठोपाठ कंगना राणौतही भडकली. तिने यानिमित्ताने ओटीटी प्लॅटफॉर्मची तुलना पॉर्न वेबसाईसोबत केली. केवळ प्रेक्षकांच्या समाधानासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अत्यंत अश्लील व हिंसक कलाकृती बनवत असल्याचा आरोप तिने केला.
‘इरॉस नाऊ’ने नवरात्रीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आणि ही पोस्ट पाहून नेटकरी भडकले.   अभिनेत्री कतरिना कैफच्या अर्धनग्न फोटोसह ‘इरॉस नाऊ’ने एक पोस्ट केली. ‘Do you want to put the ‘ratri’ in my Navratri’, असा प्रश्न या पोस्टमध्ये विचारण्यात आला होता.  ही पोस्ट वाचून सोशल मीडियावर राडा सुरु झाला. कंगनानेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली.

कंगनाने नेहमीप्रमाणे एकापाठोपाठ एक ट्वीट करून याबद्दलचा संताप बोलून दाखवला.
‘सिनेमा हे माध्यम संपूर्ण कुटुंबासोबत बसून पाहता यायला हवे. सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म फक्त एक अश्लील वेबसाईट्स आहेत. लज्जास्पद,’ असे कंगना एका ट्वीटमध्ये म्हणाली.

लोकांनाही दिला दोष

फक्त स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची चूक नाही तर चूक लोकांचीही आहे. जे संपूर्ण कुटुंबासोबत चित्रपट न पाहता पर्सनल स्पेसमध्ये केवळ असा अश्लिल कंटेन्ट बघू इच्छितात, असेही एका ट्वीटमध्ये कंगना म्हणाली. इंटरनॅशनल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरचा कंटेन्टही लैंगिक भावना चाळवणारा व उत्तेजक असल्याचे ती म्हणाली.

काय आहे प्रकरण

‘इरॉस नाऊ’ने नवरात्रीनिमित्त काही डबल मिनिंग पोस्ट शेअर केल्यात. या पोस्ट पाहून लोक भडकले. हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच ‘इरॉस नाऊ’ला माफी मागावी लागली.  
गुरूवारी ‘बॉयकॉट इरॉस नाऊ’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. लोकांनी ‘इरॉस नाऊ’चे काही जुने ट्वीटही शोधून काढले. ईदच्या मुहूर्तावर ‘इरॉस नाऊ’ने दिलेल्या शुभेच्छा आणि आता नवरात्रीबद्दल केलेल्या या पोस्टची तुलना करत लोकांनी ‘एरोस नाऊ’ला फैलावर घेतले.

मागितली माफी
सोशल मीडियावरच्या संतप्त प्रतिक्रिया बघताच ‘इरॉस नाऊ’ने नवरात्रीसंदर्भातील आपले वादग्रस्त ट्वीट डिलीट केले. सोबत माफीनामाही शेअर केला. आम्ही सर्व धर्मांचा समान आदर करतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे. आमच्या पोस्टमुळे भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असे या माफीनाम्यात लिहिले आहे. या माफीनाम्यानंतरही लोकांचा राग शांत झाला नाही. याऊपरही ‘इरॉस नाऊ’वर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु आहे.

नवरात्रीसंदर्भातील ट्विट भोवले,  #BoycottErosNow ट्रेंड होताच कंपनीचा माफीनामा

'बहुत याद आती है क-क-क कंगना, जल्द आऊंगी', पुन्हा कंगनाने उडवली मुंबई पोलिसांची खिल्ली

 

Web Title: kangana ranaut compare ott platforms to porn website for streaming sensual content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.