कंगना रणौतने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने अभिनेत्याने तिला सुनावले खडे बोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:48 PM2021-04-06T13:48:10+5:302021-04-06T13:49:13+5:30

कंगनाला नुकतेच मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर विनामास्क पाहाण्यात आले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Kangana Ranaut clicked sans mask outside dubbing studio, actor Suyyash Rai calls it 'dumbness at its best' | कंगना रणौतने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने अभिनेत्याने तिला सुनावले खडे बोल

कंगना रणौतने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने अभिनेत्याने तिला सुनावले खडे बोल

googlenewsNext
ठळक मुद्देया व्हिडिओत ती गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. सुरुवातीला तिने फोटोग्राफर्सना पोझ देण्यास नकार दिला. पण नंतर ती पोझ देऊन फोटो काढताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अभिनेता सुयश रायने यावर कमेंट केली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला असल्याने लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे असे सरकार सांगत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्या लोकांकडून दंड वसूल केला जात आहे. पण असे असले तरी लोक मास्क न घालता फिरताना दिसत आहे.

सोशल मीडियावरून सामाजिक आणि राजकिय प्रश्नांवर आपले परखड मत मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नसल्याने एका अभिनेत्याने तिला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

कंगनाला नुकतेच मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर विनामास्क पाहाण्यात आले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती गाडीतून बाहेर पडताना दिसत आहे. सुरुवातीला तिने फोटोग्राफर्सना पोझ देण्यास नकार दिला. पण नंतर ती पोझ देऊन फोटो काढताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून अभिनेता सुयश रायने यावर कमेंट केली आहे. 

कंगनाच्या या व्हिडिओवर सुयश रायने दिलेली कमेंट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याने या कमेंटमध्ये लिहिले आहे की, जगाला ज्ञान द्यायला सगळ्यात पुढे येतात. मूर्खपणाचा कळस.... सुयशच्या या कमेंटवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्यानंतर त्याची पत्नी अभिनेत्री किश्वर मर्चंटने देखील कंगनाला सुनावले आहे.

Web Title: Kangana Ranaut clicked sans mask outside dubbing studio, actor Suyyash Rai calls it 'dumbness at its best'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.