कंगना रनौतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका, 'या' अपशब्दाचा केला वापर....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 11:30 AM2020-08-10T11:30:37+5:302020-08-10T11:31:48+5:30

कंगना गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून अनेक कलाकारांवर नेपोटिज्म आणि ग्रपिज्मचे आरोप लावत आहे. आता कंगनाने आउटसाइडर्स कलाकारांवर टीका सुरू केली आहे.

Kangana Ranaut on Ayushmann Khurrana and Sushant Singh Rajput Case | कंगना रनौतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका, 'या' अपशब्दाचा केला वापर....

कंगना रनौतची आयुष्मान खुराणावर गंभीर टीका, 'या' अपशब्दाचा केला वापर....

googlenewsNext

अभिनेत्री कंगना रनौत ही तशीच नेहमीच काहीना काही वादग्रस्त विधान करण्यासाठी चर्चेत असते. पण सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून ती आणखीच संतापलेली बघायला मिळत आहे. एक-एक करून ती अनेक बॉलिवूड अभिनेते आणि डायेक्टरवर गंभीर आरोप आणि टीका करत सुटली आहे. अशात आता तिने अभिनेता आयुष्मान खुराणावर गंभीर आरोप केलाय. काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुराणा याने रिया चक्रवर्तीची बाजू घेणारं वक्तव्य केलं होतं. ज्यावरून कंगना चांगलीच चिडली आहे. कंगनाने आयुष्मानला चक्क 'चापलूस आउटसायडर' म्हटलंय.

कंगना गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरून अनेक कलाकारांवर नेपोटिज्म आणि ग्रपिज्मचे आरोप लावत आहे. आता कंगनाने आउटसाइडर्स कलाकारांवर टीका सुरू केली आहे. तिने काही दिवसांपूर्वी महेश भट्ट, करण जोहर, सलमान खान आणि आलिया भट्टसहीत अनेकांवर टीका केली आहे. आता तिने KRK चं एक ट्विट रिट्विट करत आयुष्मानवर निशाणा साधला आहे.

कमाल आर खान याने आयुष्मानबाबत एक ट्विट केलं होतं. ज्यात त्याने आयुष्मान हा तीन कारणांमुळे नेपोटिज्म आणि स्टार किड्सना सपोर्ट करतो हे सांगितलं. त्याच्यानुसार ती तीन कारणे म्हणजे, १) आयुष्मानला बॉलिवूडमध्ये रहायचंय. २) तो यशराज फिल्म्सचा कलाकार आहे. ३) सुशांत सिंह राजपूत हा त्याचा स्पर्धक होता. केआरके इतक्यावर थांबला नाही तर त्याने लिहिले की, 'घाबरू नकोस, तुझे सिनेमे येतील आणि जनता तुला उत्तर देईल. ऑल दी बेस्ट'.

केआरकेच्या याच ट्विटवर कंगनाची नजर पडली. तिनेह ट्विट रिट्विट केलं. पण कमेंट करताना आयुष्मानचं नाव घेणं टाळलं. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की, 'चापलूस आउटसाइडर्स केवळ एका कारणाने माफियांना सपोर्ट करतात. ते आहे त्यांच्या विचारातील सामान्यता. त्यांना इंडस्ट्रीतून कुणी धमकावत नाही. कंगना आणि सुशांतसारख्या लोकांची ते खिल्ली उडवतात. आणि ते खरं काही सांगत नाहीत'.

हे पण वाचा :

 प्रेक्षक तुलाही धडा शिकवतील...! रिया चक्रवर्तीला पाठींबा देणा-या आयुष्यमान खुराणावर बरसला केआरके

Web Title: Kangana Ranaut on Ayushmann Khurrana and Sushant Singh Rajput Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.