ठळक मुद्देकंगना आणि राजकुमारच्या जजमेंटल है क्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सात ते आठ कोटींचा गल्ला जमवला असून या चित्रपटाला द लॉयन किंग हा चित्रपट तगडी टक्कर देत आहे.

कंगना राणौत आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला जजमेंटल है क्या हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले आहे. या चित्रपटाची कथा चांगली असण्यासोबतच या चित्रपटात राजकुमार आणि कंगना यांचे काम खूपच चांगले असल्याचे अनेकांनी चित्रपटाची समीक्षा करताना म्हटले आहे. या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

कंगना आणि राजकुमारच्या जजमेंटल है क्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सात ते आठ कोटींचा गल्ला जमवला असून या चित्रपटाला द लॉयन किंग हा चित्रपट तगडी टक्कर देत आहे. पण तरीही जजमेंटल है क्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवेल असे म्हटले जात आहे. हा चित्रपट केवळ ३५ कोटींमध्ये बनवण्यात आलेला आहे.

जजमेंटल है क्या हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी चांगलाच वादात अडकला होता. या चित्रपटाचे शीर्षक सुरुवातीला मेंटल है क्या असे होते. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत सेन्सॉर बोर्ड, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले होते. केवळ इतकेच नाही तर दीपिका पादुकोणच्या ‘द लिव्ह लाफ फाऊंडेशन’नेही या चित्रपटाच्या मेकर्सवर टीका करत आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे म्हटले होते. 

या शीर्षकावरून वाद निर्माण झाल्यानंतर शीर्षक बदलून ते जजमेंटल है क्या असे ठेवण्यात आले. या चित्रपटात बॉबी (कंगना रणौत) आणि केशव (राजकुमार राव) या दोन मनोरूग्णांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलामुडी यांनी केले आहे तर एकता कपूर, शोभा कपूर आणि शैलेश आर सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


Web Title: Kangana Ranaut and Rajkummar Rao's judgemental hai kya first day collection
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.