kangana ranaut and rajkummar rao mental hai kya trailer cancelled |  ‘मेंटल है क्या’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट ऐनवेळी रद्द, काय आहे कारण?
 ‘मेंटल है क्या’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट ऐनवेळी रद्द, काय आहे कारण?

ठळक मुद्देया चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल आणि चर्चा होणार नाही, असे होऊच शकत नाही. लवकरच कंगनाचा ‘मेंटल है क्या’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि नेहमीप्रमाणे हा चित्रपट चांगल्या-वाईट अशा दोन्ही कारणांसाठी चर्चेत आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज झाले आहेत आणि आता चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. आज १९ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार म्हटल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण ताजी खबर मानाल तर हा ट्रेलर रद्द झाला आहे.
काल मंगळवारी या चित्रपटाचे नवे मोशन पोस्टर रिलीज झाले होते. ट्रेलर कमिंग सून असा मॅसेज या पोस्टरसोबत देण्यात आला होता. पण पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याचे कारण आहे, चित्रपटाच्या टायटलचा वाद.
होय,  इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने  ‘मेंटल है क्या’  या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत, सेन्सॉर बोर्ड, माहिती व प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले आहे. केवळ इतकेच नाही तर दीपिका पादुकोणच्या ‘द लिव्ह लाफ फाऊंडेशन’नेही या चित्रपटाच्या मेकर्सवर टीका करत, आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे म्हटले आहे. 

नाही म्हणायला या वादावर नेहमीप्रमाणे कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली मैदान लढवते आहे. पण ‘मेंटल है क्या’ची निर्माती एकता कपूर मात्र हा वाद आणखी वाढवण्याच्या मूडमध्ये नाही. त्याचमुळे  सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चा खरी मानाल तर चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची तारीख पुढे ढकलण्यामागे केवळ आणि केवळ हेच एक कारण आहे. या चित्रपटात कंगनासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे.


Web Title: kangana ranaut and rajkummar rao mental hai kya trailer cancelled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.