काय सांगता, ‘बिग बॉस 13’चा हा स्पर्धक बनणार सुहाना खानचा ‘हिरो’; होणार डेब्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 03:32 PM2020-02-16T15:32:40+5:302020-02-16T15:32:52+5:30

सुहानाच्या डेब्यूची जोरदार चर्चा

kamaal r khan says karan johar going to launch asim riaz with suhana khan | काय सांगता, ‘बिग बॉस 13’चा हा स्पर्धक बनणार सुहाना खानचा ‘हिरो’; होणार डेब्यू?

काय सांगता, ‘बिग बॉस 13’चा हा स्पर्धक बनणार सुहाना खानचा ‘हिरो’; होणार डेब्यू?

googlenewsNext
ठळक मुद्देआसिम रियाजला ‘बिग बॉस 13’ ने त्याला खूप मोठी लोकप्रियता मिळवून दिली.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अनेकदा अशा चर्चा झाल्यात आणि हवेत विरल्या. पण आता पुन्हा एकदा सुहानाच्या डेब्यूची जोरदार चर्चा सुरू आहेत. होय, याचे कारण म्हणजे आता एका बॉलिवूड अभिनेता आणि निर्मात्याने सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा खुलासा केला आहे. तिच्यासोबत ‘बिग बॉस 13’मधील एक स्पर्धकही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे या अभिनेता व निर्मात्याने म्हटले आहे.
सुहानाच्या डेब्यूबद्दल खुलासा करणारा हा अभिनेता व निर्माता कोण, तर केआरके अर्थात कमाल आर खान. कायम वादग्रस्त पोस्ट करून वाद ओढवून घेणा-या केआरकेने आता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार असल्याचे म्हटले आहे.

केवळ इतकेच नाही तर पहिल्या सिनेमात ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता आसिम रियाज तिचा हिरो असल्याचेही म्हटले आहे. या दोघांना बॉलिवूड निर्माता करण जोहर लॉन्च करणार असल्याचेही त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
 ‘माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माता करण जोहर सुहाना खान आणि आसिम रियाजला त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’साठी साइन करणार आहे, असे ट्वीट केआरकेने केले आहे.


 केआरकेचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अर्थात याबद्दल करण किंवा आसिम रियाज यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आसिम आणि सुहानाच्या चाहत्यांनी मात्र केआरकेच्या या ट्वीटवर  बऱ्याच कमेंट केल्या आहेत.
 


आसिम रियाजला ‘बिग बॉस 13’ ने त्याला खूप मोठी लोकप्रियता मिळवून दिली आहे. डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर जॉन सीना सुद्धा त्याचा चाहता झाला. जॉनने दोन वेळा आसिमचा फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत त्याला जिंकवण्याचे आवाहन केले होते.  

Web Title: kamaal r khan says karan johar going to launch asim riaz with suhana khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.