OMG! इतकी कशी निष्काळजी असू शकते काजोल? नेटक-यांनी घेतला क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 02:39 PM2020-03-19T14:39:48+5:302020-03-19T14:40:51+5:30

काजोल व तिची मुलगी न्यासा काल एअरपोर्टवर दिसले. या मायलेकींचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि मग काय, हा व्हिडीओ पाहून अनेकांचे माथे ठणकले.

kajol was snapped with daughter nyasa at airport get trolled due to not wearing hand gloves and mask corona virus-ram | OMG! इतकी कशी निष्काळजी असू शकते काजोल? नेटक-यांनी घेतला क्लास

OMG! इतकी कशी निष्काळजी असू शकते काजोल? नेटक-यांनी घेतला क्लास

googlenewsNext
ठळक मुद्देकाजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, नुकतीच ती ‘तान्हाजी’ या सिनेमात पती अजय देवगणसोबत दिसली होती.

कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग जणू थांबले असताना अभिनेत्री काजोल व तिची मुलगी न्यासा काल एअरपोर्टवर दिसले. या मायलेकींचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि मग काय, हा व्हिडीओ पाहून अनेकांचे माथे ठणकले. कारण काय तर, काजोल व न्यासाच्या तोंडावर ना मास्क होता, ना हातात ग्लव्ज. कोरानाची इतकी दहशत असताना या मायलेकींना कुठलीही काळजी न घेता विमानतळावर वावरताना पाहून लोकांनी दोघींचाही चांगलाच क्लास घेतला. त्यांचा हा निष्काळजीपणा पाहून लोकांनी दोघींनीही जाम फैलावर घेतले.

‘तुला काय गंमत वाटतेय. अख्खा देश ब्रेक घेऊन सरकारच्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. लोक घरात आयसोलेशनमध्ये असताना तू तुझी व तुझ्या टीमचा जीव धोक्यात घालते आाहेस. आता तरी काम बंद कर...,’ असे एका युजरने काजोल व न्यासाच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिले. तर अन्य एका युजरने  ‘हे लोक इतके अशिक्षितासारखे कसे वागू शकतात. हिची टीम तरी जास्त सतर्क दिसतेय,’ असे लिहिले आहे.

काही युजरनी तर ‘यांचीही कोरोना टेस्ट करावी,’ अशी मागणी केली आहे. अद्याप यावर काजोलची प्रतिक्रिया आलेली नाही. पण हो, इतक्या मोठ्या अभिनेत्रीने स्थिती संवेदनशील असताना इतका निष्काळलीपणा दाखवावा, हे मात्र अनेकांना खटकते आहे.

काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, नुकतीच ती ‘तान्हाजी’ या सिनेमात पती अजय देवगणसोबत दिसली होती. या सिनेमाने ब्लॉकबस्टर कमाई केली होती. यानंतर ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये ती दिसली. ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये काजोल, श्रुती हासन, नेहा धुपिया, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी आणि यशस्विनी दयामा या नऊ अभिनेत्री आहेत.  त्यात नऊ पीडित महिला आणि त्यांच्या कथा आहेत.

Web Title: kajol was snapped with daughter nyasa at airport get trolled due to not wearing hand gloves and mask corona virus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.