काजोल कोव्हिडनंतर पहिल्यांदाच काकांना भेटली, मिठी मारून रडली; दुर्गापूजेदरम्यानचे व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:17 PM2021-10-12T17:17:44+5:302021-10-12T17:18:52+5:30

Kajol Reached The Durga Puja Pandal : दूर्गापूजेदरम्यानचे काजोलचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यात काजोल इमोशनल झालेली दिसतेय.

Kajol Reached The Durga Puja Pandal She Breaks Down As She Meets Her Uncle After A Long Time Watch Video | काजोल कोव्हिडनंतर पहिल्यांदाच काकांना भेटली, मिठी मारून रडली; दुर्गापूजेदरम्यानचे व्हिडीओ व्हायरल

काजोल कोव्हिडनंतर पहिल्यांदाच काकांना भेटली, मिठी मारून रडली; दुर्गापूजेदरम्यानचे व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्यावर्षी काजोल दुर्गापूजेत सामील होऊ शकली नव्हती. अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण याच्या निधनामुळे गतवर्षी संपूर्ण कुटुंब दुर्गापूजा सेलिब्रिट करू शकलं नव्हतं.

नवरात्रौत्सवाच्या (Navratri ) निमित्ताने बॉलिवूड स्टार्सही दुर्गा पूजेत तल्लीन झालेले दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सुद्धा दरवर्षी प्रमाणे दुर्गा पूजेत सहभागी झाली. काजोल मुंबईत दरवर्षी होणा-या सप्तमी पूजेत (Kajol Reached The Durga Puja Pandal) सहभागी होते. आजही काजोलने दुर्गा पूजेला हजेरी लावली.पण यावेळी जवळच्या काही माणसांना भेटून ती जरा भावूक झाली. अगदी तिला अश्रू अनावर झालेत.
दूर्गापूजेदरम्यानचे काजोलचे काही फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. यात काजोल इमोशनल झालेली दिसतेय. मंगळवारी 12 च्या सुमारास काजोल दुर्गापूजेसाठी पोहोचली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही फोटोंमध्ये काजोलने मास्क परिधान केलेला दिसतोय तर काहींमध्ये ती मास्कशिवाय दिसतेय. व्हिडीओत अतिशय साधी गुलाबी रंगाची साडी आणि अतिशय पारंपारिक दागिने घातलेली काजोल सुंदर दिसतेय.  काजोलची चुलत बहीण शबार्नी मुखर्जी ही देखील तिच्यासोबत दिसतेय.

एका व्हिडीओत काजोल भलतीच भावुक झालेली दिसली. दीर्घकाळानंतर काजोल तिच्या एका काकांना भेटली आणि त्यांना भेटून तिचा ऊर दाटून आला. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले कोविडनंतर काका आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहून काजोलच्या डोळ्यात अश्रू आले. काजल तिच्या काकांना मिठी मारताना खूप रडली.

गेल्यावर्षी काजोल दुर्गापूजेत सामील होऊ शकली नव्हती. अजय देवगणचा चुलत भाऊ अनिल देवगण याच्या निधनामुळे गतवर्षी संपूर्ण कुटुंब दुर्गापूजा सेलिब्रिट करू शकलं नव्हतं. काजोलने याबाबतची एक पोस्टही शेअर केली होती.

Web Title: Kajol Reached The Durga Puja Pandal She Breaks Down As She Meets Her Uncle After A Long Time Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.