ठळक मुद्देतनुजा यांच्या प्रकृतीला घेऊन एक नवी अपडेट हाती आली आहे

अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे 27 मे रोजी निधन झाले. यांनतर काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती अचानक खलावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. काजोलचे रुग्णालयाबाहेर दिसली. काजोलचा फोटो सोशल मीडियावरदेखील  व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये काजोलच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. वीरू देवगण यांच्या निधनाने काजोल आधीच खचली आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरीच चिंता ती लपवू शकली नाही. 


बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार, तनुजा यांच्या प्रकृतीला घेऊन एक नवी अपडेट हाती आली आहे. त्यांना डायव्हर्टिक्यूलीस नावाचा आजार आहे. त्यामुळे त्यांची  सर्जरी करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार सर्जरीनंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती आहे. तनुजा यांना हा आठवडा रुग्णालयात ठेवण्यात येईल असा अंदाज लावण्यात येतोय.  


डायव्हर्टिक्यूलीस हा आजार पोटाशी संबंधीत आहे. गेल्या महिन्यात देखील तनुजा यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.  

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी ज्वेलथीफ, दो चोर, मेरे जीवन साथी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या गेली अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत कार्यरत असून त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. 
 


Web Title: kajol mother tanuja undergoes surgery to be in hospital for a week
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.