OMG!! काजोल भर कार्यक्रमात अहान शेट्टीला म्हणाली ‘गधा’,  व्हिडीओ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 04:15 PM2021-12-03T16:15:35+5:302021-12-03T16:16:31+5:30

Tadap Screening : होय, एक्साइटमेंटमध्ये काजोलनं असं काही केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या....

kajol calls tapap star ahan shetty gadha during tadap screening | OMG!! काजोल भर कार्यक्रमात अहान शेट्टीला म्हणाली ‘गधा’,  व्हिडीओ पाहा

OMG!! काजोल भर कार्यक्रमात अहान शेट्टीला म्हणाली ‘गधा’,  व्हिडीओ पाहा

googlenewsNext

सुनील शेट्टीचा (Suniel Shetty)  मुलगा अहान शेट्टी  (Ahan Shetty) व तारा सुतारियाचा ‘तडप’ हा सिनेमा आज चित्रपटगृहांत रिलीज झाला. त्याआधी चित्रपटाचा ग्रँड प्रीमिअर पार पडला आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी या प्रीमिअरला हजेरी लावली. सलमान खान, दिशा पाटनी, अनुपम खेर, रितेश देशमुखपासून  हर्षवर्धन कपूर असे अनेक बडे स्टार्स यावेळी दिसले. काजोल  (Kajol) यावेळी हजर होती. सध्या तिचीच चर्चा होतेय. होय, एक्साइटमेंटमध्ये काजोलनं असं काही केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अहानला चक्क तिनं ‘गधा’ म्हटलं.
‘तडप’च्या स्क्रिनिंगदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यात काजोल अहानसोबत स्टेजवर दिसतेय. पापाराझींकडे पूर्णत: दुर्लक्ष करत काजोल अहानसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करते आणि अहानची आई माना शेट्टीलाही स्टेजवर बोलावते.  

सेल्फी क्लिक करण्यासाठी ती स्वत:चा मोबाईल अहानला देते. पण अहान घाईघाईत फोटोऐवजी Boomerang मोड सिलेक्ट करतो आणि यामुळे  सेल्फीसाठी जास्त वेळ लागतोय हे  पाहून  ‘अबे ले ले गधे’ असं काजोल गमतीगमतीत म्हणते.  
हा Boomerang व्हिडीओ काजोलने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला असून अहानला त्याच्या डेब्यूसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘तडप’च्या प्रीमिअरला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण अथिया व केएल या जोडीची सर्वाधिक चर्चा झाली. अथियाने केएलसोबत धमाकेदार एन्ट्री घेतली, त्यावेळी सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. दोघांनीही कॅमेºयाला झक्कास पोझ दिल्या. अहानची गर्लफ्रेन्डही होती हजर ‘तडप’च्या प्रीमिअरला अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तान्या श्रॉफ ही सुद्धा हजर होती. तिने अहानच्या मम्मी पापासोबत म्हणजे सुनील शेट्टी व माना शेट्टीसोबत मस्तपैकी पोझ दिल्यात. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांचा ‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स 100’चा हिंदी रिमेक आहे.  

Web Title: kajol calls tapap star ahan shetty gadha during tadap screening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.