VIDEO: काजल अग्रवालने 'लंडन ठुमकदा'वर लावले ठुमके, व्हायरल झाला डान्स व्हिडीओ

By अमित इंगोले | Published: October 30, 2020 12:52 PM2020-10-30T12:52:23+5:302020-10-30T12:59:09+5:30

काजलचा हा डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. कारण ती यात मस्त एन्जॉय करत डान्स करत आहे. यात ती पिवळ्या रंगांच्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे.

Kajal Aggarwal wedding witt Gautam Kitchlu photos and videos | VIDEO: काजल अग्रवालने 'लंडन ठुमकदा'वर लावले ठुमके, व्हायरल झाला डान्स व्हिडीओ

VIDEO: काजल अग्रवालने 'लंडन ठुमकदा'वर लावले ठुमके, व्हायरल झाला डान्स व्हिडीओ

googlenewsNext

अभिनेत्री काजल अग्रवाल आज गौतम किचलूची नवरी बनणार आहे. दरम्यान या लग्नाचे अनेक फोटोज आणि व्हिडीओज समोर येत आहेत. सध्या तिचा एका घरातील लोकांसोबत डान्स करताना व्हिडीओ समोर आला आहे. यात ती 'लंडन ठुमकदा' गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे. 

काजल अग्रवालने ऑक्टोबरमध्ये फॅन्सना खूशखबर दिली होती की, ती गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. अशात तिच्या हळदीचे, मेहंदी आणि बॅचलर्स पार्टीचने अनेक फोटोज आणि व्हिडीओज समोर आले आहेत. काजल प्रायव्हेट सेरमनीमध्ये लग्न करत आहे. ज्यात तिचे जवळचे लोक आणि मित्र असतील. (लग्नाच्या एकदिवस आधी अशी रंगली काजल अग्रवालच्या हातावर गौतम किचलूच्या नावाची मेंहदी, पाहा फोटो)

काजलचा हा डान्स व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. कारण ती यात मस्त एन्जॉय करत डान्स करत आहे. यात ती पिवळ्या रंगांच्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे. तर काजल्या बहिणीसोबतच नातेवाईकही मास्क लावून दिसत आहे. वेडींग सेरमनीच्या एका कार्यक्रमासाठी गौतमही मास्क लावून आला होता. नंतर त्याचा मास्क काढून टाकण्यात आला.

लग्नाच्या एका दिवस आधी काजलच्या मेंहदीचे फोटो समोर आले आहेत, जे काजलने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. काजलच्या मेंहदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होते.

काजलने लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर कन्फर्म केली होती. ‘मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की मी गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करते आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थिती मुंबईत हा लग्न सोहळा पार पडणार आहे,’असे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

Web Title: Kajal Aggarwal wedding witt Gautam Kitchlu photos and videos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.