Kabir Singh Trailer: Shahid Kapoor’s Simmering Anger Hints at a Very Intense Love Story | व्हेरी व्हेरी अँग्री...! पाहा, ‘कबीर सिंग’चा ट्रेलर!
व्हेरी व्हेरी अँग्री...! पाहा, ‘कबीर सिंग’चा ट्रेलर!

ठळक मुद्देयेत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

प्रेमात वेड्या झालेल्या आणि त्यासाठी सगळ्या मर्यादा लांघणाºया प्रेमवीराच्या अनेक कथा आपण पडद्यावर पाहिल्या. आता असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘कबीर सिंग’. शाहिद खान स्टारर ‘कबीर सिंग’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि यातील प्रेमात अक्षरश: वेडा झालेला शाहिद पाहणे इंटरेस्टिंग आहे.
‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलगू सिनेमाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. विजय देवरकोंडा स्टारर ‘अर्जुन रेड्डी’ हा सिनेमा सुपरहिट झाला आणि आता हाच सिनेमा ‘कबीर सिंग’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.


  संदीप वंगा दिग्दर्शित या सिनेमात शाहिद कबीर सिंगची भूमिका साकारत आहे. प्रेमात असणारा शाहिद आणि प्रेमभंग झाल्यानंतरचा शाहिद या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतोय.  ट्रेलरमध्ये कबीर सिंग एका मेडिकल स्टुडंटच्या रूपात दिसतो. हा कबीर सिंग त्याची ज्युनिअर  (किआरा अडवानी) हिच्या प्रेमात पडतो. स्वभावाने अतिशय  रागीट, शीर्घकोपी असलेल्या या कबीरचा पुढे प्रेमभंग होतो आणि तो  दारुच्या आहारी जातो. अशी ही ढोबळ कथा आहे. अवघ्या काही मिनिटांत हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कियारा अडवाणीही दमदार भूमिकेत दिसतेय. एकंदर काय तर भावभावनांत अडकलेली कियारा आणि प्रेमभंग झालेला अँग्रीमॅन शाहिद कपूर या दोघांनाही पाहणे इंटरेस्टिंग आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर एकदा तरी पाहायलाच हवा.

English summary :
Kabir Singh Movie Trailer: Shahid Kapoor, kiara advani starrer 'Kabir Singh' movie trailer is out. 'Kabir Singh' is an official Hindi remake of Telugu cinema Arjun Reddy. The film is released on June 21.


Web Title: Kabir Singh Trailer: Shahid Kapoor’s Simmering Anger Hints at a Very Intense Love Story
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.