शाहिद कपूरचा कबीर सिंग पाहाण्यासाठी अल्पवयीन मुलाने लढवली ही शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 02:34 PM2019-07-04T14:34:03+5:302019-07-04T14:35:10+5:30

कबीर सिंग या चित्रपटाला A certificate देण्यात आले असल्यामुळे 18 वर्षांखालील मुला-मुलींना हा चित्रपट पाहाण्याची परवानगी नाहीये.

Kabir Singh A-rated Certificate Gets Teenagers Faking Their Age on Aadhaar Card | शाहिद कपूरचा कबीर सिंग पाहाण्यासाठी अल्पवयीन मुलाने लढवली ही शक्कल

शाहिद कपूरचा कबीर सिंग पाहाण्यासाठी अल्पवयीन मुलाने लढवली ही शक्कल

googlenewsNext
ठळक मुद्देकबीर सिंग पाहण्यासाठी एका चाहत्याने त्याच्या जन्म तारखेतच बदल केला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या आधार कार्डचा फोटो काढून मोबाईलमधील एका अ‍ॅपद्वारे जन्म तारखेत बदल केला आणि चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला.

शाहिद कपूरच्याकबीर सिंगचा ट्रेलर आल्यापासूनच या सिनेमाची हवा तयार झाली होती. शाहिदचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारच अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती आणि झालंही तसंच. शाहिदचा हा सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाने आतापर्यंत खूपच चांगला गल्ला बॉक्स ऑफिसवर मिळवला आहे. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेही टीका होत असली तरी सुद्धा या चित्रपटगृहातील गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही.

या सिनेमाची कथा, गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचे तर प्रचंड कौतुक होत आहे. तसेच या चित्रपटातील कियाराची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे. या सिनेमातील शाहिदचे अनेक डायलॉग्स प्रचंड फेमस झाले आहेत. सध्या कबीर सिंग याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहाण्याची अनेकांची इच्छा आहे.

कबीर सिंग या चित्रपटाला A certificate देण्यात आले असल्यामुळे 18 वर्षांखालील मुला-मुलींना हा चित्रपट पाहाण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे चित्रपटगृहात प्रवेश करतानाच वयाचे प्रमाणपत्र मागितले जात असल्यामुळे अल्पवयीन मुलांची चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे हा चित्रपट कसा पाहायचा असा प्रश्न अल्पवयीन मुलांना पडला आहे. एका अल्पवयीन मुलाने हा चित्रपट पाहाण्यासाठी चांगलीच शक्कल लढवली असल्याने या मुलाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कबीर सिंग पाहण्यासाठी एका चाहत्याने त्याच्या जन्म तारखेतच बदल केला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या आधार कार्डचा फोटो काढून मोबाईलमधील एका अ‍ॅपद्वारे जन्म तारखेत बदल केला आणि चित्रपटगृहामध्ये प्रवेश मिळवला.

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंह’ हा सिनेमा सध्या बॉक्स  ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे शाहिद कपूर टीकेचा धनी ठरतोय. महिलेवर हात उचलणारा, चाकूचा धाक दाखवून कपडे उतरवणारा, दारूच्या नशेत तर्र असणारा या चित्रपटातील सनकी हिरो अनेकांना भावला नाही. पण काहींना हा कबीर सिंग प्रचंड आवडला असून ते त्याच्या प्रेमात पडले आहेत. 

Web Title: Kabir Singh A-rated Certificate Gets Teenagers Faking Their Age on Aadhaar Card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.