ठळक मुद्दे ‘कबीर सिंग’ने पहिल्या दिवशी २०. २१ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुस-या दिवशी २२.७१ कोटी रुपये, तिस-या दिवशी २७.९१ कोटी रुपये, तर सोमवारी आणि मंगळवारी  अनुक्रमे १७.५४ आणि १६.५३ कोटींची कमाई केली आहे.

कबीर सिंग’ या चित्रपटाने पाचच दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आणि शाहिद कपूरला त्याच्या करिअरमधील पहिला ‘शंभर करोडी’ सोलो चित्रपट मिळाला. या यशामुळे शाहिद कपूर सध्या जाम खूश आहे आणि आता कदाचित या यशाची फळे चाखण्याची वेळही आली आहे. होय,  ‘कबीर सिंग’नंतर माझ्याकडे एकही चित्रपट नाही, असे अलीकडे शाहिदने म्हटले होते. पण  ‘कबीर सिंग’च्या यशानंतर शाहिदचा फोन पुन्हा खणखणू लागला आहे. ताजी चर्चा खरी मानाल, एक मोठा चित्रपट त्याच्या हाती लागला आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘जर्सी’.


‘जर्सी’ हा एक तेलगू चित्रपट आहे. याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये शाहिदची वर्णी कन्फर्म मानली जात आहे. करण जोहरने अलीकडे ‘जर्सी’ या तेलगू चित्रपटाचे अधिकार खरेदी केले. या चित्रपटात शाहिदने काम करावे, अशी करण जोहरची इच्छा आहे. अर्थात अद्याप अधिकृत स्टारकास्टची घोषणा झालेली नाही. 
‘जर्सी’ हा तेलगू चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता. तेलगू स्टार नानी यात प्रमुख भूमिकेत होता. त्याने एका क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. तेलगू बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. याच सुपरडुपर हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहिद कपूर दिसण्याची शक्यता आहे. करण जोहर हा सिनेमा प्रोड्यूस करणार आहे.  ‘कबीर सिंग’ हा चित्रपटही ‘अर्जुन रेड्डी’ या साऊथ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

 ‘सध्या माझ्याकडे काम नाही’

 सध्या माझ्याकडे काम नाही. ‘कबीर सिंग’नंतर माझ्याकडे   एकही चित्रपट नाही. मनातल्या मनात मला ही गोष्ट अस्वस्थ करतेय. पुढे मी काय करणार, हे मला ठाऊक नाही. अर्थात चित्रपट नसताना माझ्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी असतात,असे शाहिद नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला होता.


पाचच दिवसांत १०० कोटी
 ‘कबीर सिंग’ने पहिल्या दिवशी २०. २१ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुस-या दिवशी २२.७१ कोटी रुपये, तिस-या दिवशी २७.९१ कोटी रुपये, तर सोमवारी आणि मंगळवारी  अनुक्रमे १७.५४ आणि १६.५३ कोटींची कमाई केली आहे. ही एकूण कमाई  १०४.९० कोटी रुपयांच्या घरात आहे.  

 


Web Title: kabir singh 100 crore collection now karan johar to remake nani jersey with shahid kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.