LockDown दरम्यान भारतात परतण्यासाठी जुही चावलाला करावा लागला मोठा खटाटोप, अशी परतली तिच्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:41 PM2020-04-02T15:41:29+5:302020-04-02T15:42:40+5:30

कोरोनाव्हायरसने परदेशात धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे भीतीपोटी जुही चावला कुटुंबासह मुंबईत परतली.

Juhi Chawla shares Her Experience how she Travel From UK To Mumbai Just Before THe Covid-19 Expansion-SRJ | LockDown दरम्यान भारतात परतण्यासाठी जुही चावलाला करावा लागला मोठा खटाटोप, अशी परतली तिच्या घरी

LockDown दरम्यान भारतात परतण्यासाठी जुही चावलाला करावा लागला मोठा खटाटोप, अशी परतली तिच्या घरी

googlenewsNext


कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आहे. लॉक डाउन जाहीर होण्याधी सर्व देशातून येणारे जाणारे विमानेउड्डाणं बंद झाल्यानंतरही अभिनेत्री जुही चावला भारतात परतली आणि तिचा जीव भांड्यात पडला. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला हा व्हायरस, संपूर्ण जगात पसरला. इटली, स्पेन या देशांमध्ये तर चीनपेक्षा अधिक बळी गेले आहेत. भारताने वेळीच सावध होत लॉकडाऊनचं पाऊल उचललं खरं, पण यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर लंडनला गेलेली जुही चावला तिथेच अडकली होती. भारतात परतण्यासाठी तिला अखेर भारतीय दुतावासाच्या मदत घ्यावी लागली. तो अनुभवही तिने चाहत्यांस  इंस्टाग्रामवर शेअर केला 


कोरोनाव्हायरसने परदेशात धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे भीतीपोटी जुही चावला कुटुंबासह मुंबईत परतली. लंडनमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनापासून सुरक्षित राहाता यावे म्हणून तिने परतण्याचा निर्णय घेतला. २० मार्चला जुही मुंबईत परतली, नियमानुसार संपूर्ण कुटुंबाने सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले होते. 


 गायिका कनिका कपूरही देखील लंडनलाच गेली होती. लंडनहून परतल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणं आढळली होती. कनिकाची परिस्थिती सध्या गंभीर आहे. सतत पाचव्यांदा केलेल्या टेस्टमध्ये देखील कोरोना पॉजिटीव्ह येत आहे. कनिकाने योग्य वेळी योग्य खबरदारी घेतली नाही. त्यामुळे इतरांनाही लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तुर्तास कनिका कपूरचे कुटुंबिय तिच्या तब्येतीला घेऊन चिंतीत आहेत. कनिकाला तीन मुलं आहेत. तीन्ही मुलं तिची लंडनमध्येच राहतात. 

Web Title: Juhi Chawla shares Her Experience how she Travel From UK To Mumbai Just Before THe Covid-19 Expansion-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.