ठळक मुद्देअर्जुनमध्ये अभिनेता बनण्याचे सर्व गुण आहेत, असे जुहीचे मत आहे.

अभिनेत्री जुही चावलाची मुलं बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर आहेत. आपल्या आईसोबत ते कधीच कुठल्या पार्टी वा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. पण येत्या काही वर्षांत जुही चावलाचा मुलगा अर्जुन बॉलिवूड दुनियेचा भाग होईल, अशी शक्यता मात्र आहे. होय, खुद्द जुहीने याबाबतचे संकेत दिले आहेत. अर्जुनमध्ये अभिनेता बनण्याचे सर्व गुण आहेत, असे जुहीचे मत आहे. निश्चितपणे जुहीचा मुलगा बॉलिवूडमध्ये यायला आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहेत.  


जुहीला दोन मुले आहेत. जान्हवी नावाची मुलगी आणि अर्जुन नावाचा मुलगा. तिची ही दोन्ही मुलं लंडनमध्ये शिकत आहेत. ऐरवी जुही कधीच मुलांबद्दल बोलत नाही. पण अलीकडे एका मुलाखतीत ती मुलांबद्दल बोलली. माझी मोठी मुलगी जान्हवी काय बनणार, हे मला ठाऊक नाही. ती म्हणजे पुस्तकी किडा आहे. गिफ्ट काय हवे, असे विचारले की, पुस्तक, असेच तिचे उत्तर ठरलेले असते. एकेदिवशी तिने लेखिका बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अद्यापही ती काय बनणार हे मला ठाऊक नाही. अर्थात माझा छोटा मुलगा अर्जुन एकदम चंचल, मनमौजी  आहे. कुणाची नक्कल उतरवण्याचा गुण त्याच्यात आहे. तो खरोखरच हसतमुख आणि प्रतिभावान आहे. त्याने अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करावे, असे मला कधीकधी वाटते. पण मम्मा, सध्या काहीही विचार करू नकोस, असे तो मला नेहमी म्हणतो, असे जुहीने यावेळी सांगितले.
आता जुहीचा अर्जुन आईची इच्छा पूर्ण करत अ‍ॅक्टिंग क्षेत्रात येतो की त्याच्या दुसºया कुठल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावतो, हे बघूच.


जुही चावलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. या चित्रपटात सोनम कपूर, राजकुमार राव, अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते.


Web Title: juhi chawla confirms that her son wants to be actor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.