अशी नशीबाने थट्टा मांडली...! जुगल हंसराजने 35 सिनेमे साईन केले पण...!  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:30 PM2021-05-18T16:30:06+5:302021-05-18T16:32:10+5:30

घर से निकलते ही ... आजही हे गाणे आठवले तरी, जुगलचाच चेहरा डोळ्यांपुढे येतो. हा जुगल सध्या कुठे आहे?

jugal hansraj film papa kahte hain completes 25 years check out where actor is today | अशी नशीबाने थट्टा मांडली...! जुगल हंसराजने 35 सिनेमे साईन केले पण...!  

अशी नशीबाने थट्टा मांडली...! जुगल हंसराजने 35 सिनेमे साईन केले पण...!  

googlenewsNext
ठळक मुद्देकरण जोहर जुगल हंसराचा लहानपणीचा मित्र आहे. चित्रपटांत जम बसत नाही, हे लक्षात आल्यावर जुगलने त्यातून बाहेर पडणे योग्य समजले.

महेश भट दिग्दर्शित ‘पापा कहते हैं’ ( Papa Kahte Hain )या सिनेमाला काल 17 मे रोजी 25 वर्षे पूर्ण झालीत. या सिनेमाने अभिनेता जुगल हंसराजला ( Jugal Hansraj ) एका रात्रीत स्टार बनवले होते. त्याच्यावर चित्रीत ‘घर से निकलते ही’ या गाण्याने तर सर्वांनाच वेड लावले होते. आजही हे गाणे आठवले तरी, जुगलचाच चेहरा डोळ्यांपुढे येतो. हा जुगल सध्या कुठे आहे?
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जुगलने ‘पापा कहते हैं’च्या निमित्ताने काही जुन्या आठवणी ताज्या केल्यात. ‘पापा कहते हैं’ने 25 वर्षे पूर्ण केलीत, याचा आनंद आहे, कधी कधी मी आता म्हातारा झालोय, असे मला वाटते. पण पुन्हा ‘पापा कहते हैं’मधला तो तरूण मुलगा मला आठवतो, असे तो म्हणाला.

35-40 प्रोजेक्ट साईन केलेत पण...
एका जुन्या मुलाखतीत जुगल करिअरवर बोलला होता. तो म्हणाला होता, मी माझ्या करिअरमध्ये 35-40 प्रोजेक्ट साईन केलेत. पण दुर्दैवाने ते कधीच पूर्ण झाले नाहीत. असे अनेकदा झाले, अनेक प्रोजेक्ट सुरुच झाले नाहीत. हे सिनेमे सुरू झाले असते, रिलीज झाले असते तर आज करिअरचे चित्र काही वेगळे असते.
  1983 मध्ये जुगलने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली ती बालकलाकार म्हणून. होय, ‘मासूम’ या चित्रपटात तो बालकलाकार म्हणून दिसला. यानंतर 1986 मध्ये आलेल्या ‘कर्मा’ आणि ‘सुहागरात’ या चित्रपटातही त्याने बालकलाकार साकारला. 1996 मध्ये ‘पापा कहते है’ या चित्रपटातून जुगलने बॉलिवूड डेब्यू केला. पण लोकांच्या नजरेत येण्यासाठी त्याला सन 2000 ची प्रतीक्षा करावी लागली. सन 2000 मध्ये जुगल ‘मोहब्बतें’मध्ये दिसला. मल्टीस्टारर असला तरी हा जुगलचा पहिला हिट सिनेमा होता.

2002 मध्ये ‘प्यार तुम्ही से कर बैठे’मध्ये तो दिसला. पण हा चित्रपट फ्लॉप राहिला. यानंतर जुगलने एक मोठा ब्रेक घेतला. 2010 मध्ये ‘प्यार इंम्पॉसिबल’मधून त्याने कमबॅक केले. पण हा चित्रपटही दणकून आपटला. यानंतर जुगल इंडस्ट्रीत अधूनमधून दिसला. माधुरीसोबत ‘आजा नचले’ आणि याचवर्षी आलेल्या ‘कहानी2’मध्ये जुगल खलनायकाच्या भूमिकेत दिसला. पण यात त्याची भूमिका अतिशय लहान होती.

फार कमी लोकांना माहित असले की,‘कभी खुशी कभी गम’च्या शीर्षक गीताच्या 8 ओळी जुगलने लिहिल्या होत्या. केवळ लिहिल्याच नव्हत्या तर त्या कंपोजही केल्या होत्या.

2014 मध्ये जुगलने त्याची एनआरआय गर्लफ्रेन्ड जास्मीनसोबत लग्न केले. हे लग्न अतिशय गुपचूप झाले. जुगलच्या एका मित्राने सोशल मीडियावर जुगलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा कुठे त्याच्या लग्नाची बातमी उघड झाली होती. जॅस्मीन न्यूयॉर्कमध्ये इव्हेस्टमेंट बँकर आहे.

करण जोहर जुगल हंसराचा लहानपणीचा मित्र आहे. चित्रपटांत जम बसत नाही, हे लक्षात आल्यावर जुगलने त्यातून बाहेर पडणे योग्य समजले. सध्या तो करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करतो. शिवाय राईटर म्हणूनही त्याने नवी ओळख निर्माण केली आहे.

Web Title: jugal hansraj film papa kahte hain completes 25 years check out where actor is today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.